आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केवळ अनुराग कश्यपचेच नव्हे तर या सेलेब्सचेही दुसरे लग्न ठरले अपयशी, थाटला तिसरा संसार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडच्या यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या अनुराग कश्यपला वेगळ्या धाटणीच्या सिनेमांसाठी ओळखले जाते. आज अनुरागने वयाची 43 वर्षे पूर्ण केली आहेत. 10 सप्टेंबर 1972 रोजी उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथे अनुरागचा जन्म झाला.
खासगी आयुष्य...
गोरखपुरमध्ये जन्मलेल्या अनुरागचे वडील उत्तर प्रदेशातील पॉवर कॉर्पोरेशनमध्ये नोकरीला होते. त्याचा धाकटा भाऊ अभिनव कश्यपसुद्धा दिग्दर्शक असून त्याने 2010 मध्ये 'दबंग' या ब्लॉकबस्टर सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. अनुरागची बहीण अनुभूती कश्यपसुद्धा दिग्दर्शिका असून तिने 'देव डी' आणि 'गँग्स ऑफ वासेपूर' या सिनेमांसाठी सहायक दिग्दर्शिका म्हणून काम केले होते.
खरं तर अनुराग यांचा 'पांच' हा पहिला सिनेमा होता. मात्र काही कारणास्तव अद्याप तो रिलीज होऊ शकलेला नाही. बॉलिवूडमध्ये ऑफ बीट सिनेमांसाठी अनुरागला ओळखले जाते.
दोनदा थाटले लग्न...
अनुरागने आपल्या आयुष्यात दोनदा लग्न केले. मात्र त्याची ही दोन्ही लग्ने यशस्वी ठरु शकली नाही. खरं तर दुसरी पत्नी कल्कि कोचलिनसह अद्याप तो कायदेशीररित्या विभक्त झालेला नाहीये. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे कपल वेगवेगळे राहात आहे. मध्यंतरी बातमी आली होती, की अनुराग आणि हुमा कुरैशी यांच्यात वाढत चाललेल्या जवळीकमुळे या दोघांचे ब्रेकअप झाले. मात्र नंतर ही बातमी अफवा ठरली. अनुरागसोबत नाव जोडल्यानंतरसुद्धा हुमा आणि कल्कि चांगल्या मैत्रीणी आहेत. 30 एप्रिल 2011 मध्ये उटीतील अनुरागच्या घरी या दोघांचे लग्न झाले होते. 'देव डी' या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान कल्कि आणि अनुराग यांचे सूत जुळले होते. मात्र नोव्हेंबर 2013 मध्ये हे दोघे विभक्त झाले.
आरती बजाज होती पहिली पत्नी...
अनुरागचे पहिले लग्न 2003 मध्ये आरती बजाजसह झाले होते. आरती फिल्म एडीटर आहे. जब वी मेट, हनीमून ट्रॅव्हल्स, देव डी, आमिर, रॉकस्टार आणि हाईवे या सिनेमांसाठी तिने एडीटर म्हणून काम केले आहे. 'पांच' या अनुरागच्या पहिल्या सिनेमाच्या एडिटींगवेळी आरती आणि तो जवळ आला होता. मात्र हा सिनेमा रिलीज होऊ शकला नाही आणि अनुराग डिप्रेशनमध्ये गेला. त्याला व्यसनसुद्धा जडले. याचा परिणाम या दोघांच्या नात्यावर पडला आणि 2009 मध्ये या दोघांचे नाते संपुष्टात आले.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अशा काही स्टार्सविषयी ज्यांची दोन लग्ने अयशस्वी ठरली आणि थाटला तिसरा संसार...