आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Celebs Did Not Have Child After Marriage

अनुपम-किरण खेरसह या 5 बॉलिवूड कपल्सनासुध्दा नाही मुलबाळ!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अनुपम आणि किरण खेर) - Divya Marathi
(अनुपम आणि किरण खेर)
बॉलिवूडमध्ये अनेक सेलेब्स आहेत, ज्यांना स्वत:ची मुले नाहीत. त्यात अनुपम खेर यांनासुध्दा गणले जाते. आज 61वा वाढदिवस साजरा करणारे अनुपम खेर यांनी अभिनेत्री किरण ठाकर सिंह यांच्याशी 1985मध्ये लग्न केले. मात्र अनुपम यांनी किरण यांच्याशी लग्न केले, त्यावेळी त्या घटस्फोटीत आणि एका मुलाच्या आई होत्या. अनुपम आणि किरण खेर यांच्या लग्नाला 31 वर्षे झालीत. परंतु त्यांना स्वत:चे एकही आपत्य नाही. बॉलिवूडमध्ये अनेक सेलेब्स आहेत, ज्यांना स्वत:ची आपत्ये नाहीत.
अनुपम खेर यांचा जन्म 7 मार्च, 1955ला शिमल्यात झाला. त्यांनी करिअरची सुरुवात 1982मध्ये आलेल्या 'आगमन' सिनेमातून केली होती. परंतु 1984मध्ये आलेल्या 'सारांश' त्यांचा पहिला हिट सिनेमा होता. अनुपम अभिनयाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी ठरले. अभिनेता, कॉमेडिअन, खलनायक तसेच वयस्कर भूमिका सर्वच पात्रात त्यांनी ठसा उमटवला. त्यांना अभिनयाच्या या मोठ्या प्रवासा तब्बल 350पेक्षा जास्त सिनेमांत काम केले. त्यांनी 'कर्मा', 'तेजाब', 'राम लखन', 'ताकतवर', 'परिंदा', 'चांदनी', 'डैडी', 'चालबाज', 'दिल', 'सौदागर', 'बेटा', 'लम्हे', 'हम' सह अनेक सिनेमांत दमदार अभिनय केला. बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर त्यांनी पत्नी आणि अभिनेता सिकंदर खेर (सावत्र) त्यांचा मुलगा आहे.
आज आम्ही तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून अशा सेलेब्सना भेटवणार आहोत, ज्यांना आपत्ये नाहीत...पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या...