आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुमताज, रजनीकांतसह या 9 सेलिब्रिटींनी दिला आहे असाध्य आजारासोबत लढा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 8 जुलै रोजी 'कॉमेडी किंग' कपिल शर्माला कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त होते. कपिल त्याच्या शोच्या सेटवरच बेशुद्ध पडल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यामुळे त्यादिवशीचं शूटींग होऊ शकले नाही. त्यामुळे शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांनाही आल्यापावली माघारी परतावे लागले होते. आता याप्रकरणी एक नवीच माहिती समोर आली आहे. कपिल त्यादिवशी खरं तर आजारी नव्हताच. त्याला आपल्या आगामी सिनमाचे शूटींग करायचे होते, म्हणून त्याने आजारपणाचे नाटक केल्याचे वृत्त एका ऑनलाइन पोर्टलने दिले आहे. कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाशी संपर्क साधण्यात आला असता कपिल शर्मा उपचारासाठी दाखल झाल्याची कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कपिल त्यादिवशी उपचारासाठी रुग्णालयात गेलाच नव्हता. उलट दुसऱ्या दिवशी तो लोखंडवालामध्ये जनरल स्टुडिओमध्ये आपल्या 'फिरंगी' या आगामी सिनेमाच्या शूटींगसाठी दाखल झाला होता, असे वृत्त वेबपोर्टलने दिले.
 
आता यात किती तथ्य आहे, हे तर कपिल शर्मालाच ठाऊक. पण बॉलिवूडमध्ये असे काही सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी गंभीर आजाराशी लढा दिला आहे. काही अद्यापही त्या आजाराशी लढत आहेत, तर काहींनी आजारपणातून स्वतःची सुटका करुन घेतली आहे. कोण आहेत हे सेलिब्रिटी जाणून घेऊयात..
 
मुमताज
अभिनेत्री मुमताज यांना 2002 साली ब्रेस्ट कॅन्सर झाला होता.  त्यावेळी त्यांचे वय 54 वर्षए होते. याकाळात त्यांना 6 वेळा किमोथेरपी आणि 35 वेळा रेडियेशन्सच्या प्रक्रियेतून जावे लागले होते. त्यावेळी मुमताज म्हणाला होत्या, ''मी शेवटच्या श्वासापर्यंत हार मानणार नाही.'' 
 
रजनीकांत
दाक्षिणात्य सुपस्टार थलायवा रजनीकांत यांना 2011 साली सिंगापूरमधील माऊंट एलिजाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. किडनी तसेच श्वसन संक्रमणासंबंधी असलेल्या समस्येमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सहा आठवड्यानंतर रजनीकांत यांनी डिस्चार्ज देण्यात आला होता. 2016 मध्ये आलेल्या 'कबाली' सिनेमानंतर त्यांनी एक आठवडा विश्रांती करण्याचा सल्ला देण्यात आला होता. रजनीकांत काही दिवसांपूर्वीच नियमित वैद्यकीय तपासणीसाठी अमेरिकेला गेले होते. 

पुढील स्लाईड्सवर वाचा, सलमान, सोनमसह बॉलिवूडच्या आणखी कोणकोणत्या सेलिब्रिटींना झाला गंभीर आजार... 
बातम्या आणखी आहेत...