आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरपासून ते शाहरुखपर्यंत, बी टाऊनमध्ये फेमस होण्यापूर्वीच हे सेलिब्रिटी चढले होते बोहल्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थातच आमिर खानने वयाची 52 वर्षे पूर्ण केली आहेत. 14 मार्च 1965 रोजी मुंबईत त्याचा जन्म झाला. आमिरचे पूर्ण नाव आमिर हुसैन खान आहे. त्याच्या वडिलांचे नाव ताहिर हुसैन आणि आईचे नाव जीनत आहे. आमिर पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर बालकलाकाराच्या रुपात झळकला होता. त्याचे काका नासिर हुसैन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘यादों की बरात’ (1973) हे त्या सिनेमाचे नाव होते.   
 
प्रसिद्धीझोतात येण्यापूर्वीच रीनावर जडला होता आमिरचा जीव...
आमिर खान बॉलिवूडच्या अशा स्टार्सपैकी एक आहे, ज्याने लाइमलाइटमध्ये येण्यापूर्वीच लग्न करुन संसार थाटला. आमिरच्या पहिल्या पत्नीचे नाव रीना दत्ता आहे. आमिर आणि रीना यांची प्रेमकहाणीसुद्धा रंजक आहे. शेजारी राहणा-या रीनासोबत पळून जाऊन आमिरने लग्न केले होते. त्यावेळी तो केवळ 21 वर्षांचा होता. बालकलाकाराच्या रुपात आपल्या करिअरला सुरुवात करणा-या आमिरला पहिले यश 1988 मध्ये रिलीज झालेल्या 'कयामत से कयामत तक' या सिनेमामुळे मिळाले होते. हा सिनेमा रिलीज होण्याच्या दोन वर्षांपूर्वी म्हणजे 1986 मध्ये आमिरने रीनासोबत लग्न केले होते. 16 वर्षे संसार केल्यानंतर मात्र आमिर आणि रीना यांच्या नात्यात वितुष्ठ निर्माण झाले. 2002 मध्ये आमिरने रीनाला घटस्फोट दिला. या दाम्पत्याला इरा ही मुलगी आणि जुनैद हा मुलगा आहे. रीनापासून विभक्त झाल्यानंतर 2005 मध्ये आमिरने किरण रावसोबत दुसरा संसार थाटला. आता आमिर आणि किरणलासुद्धा एक मुलगा असून आझाद राव खान असे त्याचे नाव आहे. आझादचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला आहे.
 

शाहरुख खान आणि गौरी खान 
आमिरप्रमाणेच बॉलिवूडचा किंग शाहरुख खाननेसुद्धा स्टारपद मिळवण्यापूर्वीच लग्न केले. दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे गौरीच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. गौरीच्या कुटुंबीयांची समजूत घालताना शाहरुखच्या नाकी नऊ आले होते. अखेर त्याने गौरीच्या कुटुंबीयांचा होकार मिळवण्यात यश मिळवले. 26 ऑगस्ट 1991 रोजी शाहरुख आणि गौरीचे कोर्टात लग्न झाले. दोघांचा निकाहसुद्धा झाला. यावेळी गौरीचे नाव आयशा ठेवण्यात आले होते. त्यानंतर 25 ऑक्टोबर 1991 रोजी हिंदू पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले. लग्नाच्या संगीत कार्यक्रमात या दोघांनी एकत्र डान्सदेखील केला होता. लग्नाच्या वर्षभरानंतर म्हणजे 1992मध्ये शाहरुखचा 'दीवाना' हा पहिला सिनेमा रिलीज झाला होता. त्यापूर्वी त्याने 'फौजी' या टीव्ही मालिकेत काम केले होते.
 
बी टाऊनमध्ये आमिर आणि शाहरुखप्रमाणेच आणखी काही स्टार्स आहेत, जे करिअरमध्ये स्थिरस्थावर होण्याआधी संसारात रमले. कोण आहेत, हे स्टार्स ज्यांनी स्टारपद मिळण्यापूर्वी लग्नाचा निर्णय घेतला, जाणून घ्या पुढील स्लाईड्सवर...
बातम्या आणखी आहेत...