आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Fat To Fit झाली परिणीती चोप्रा, हे 12 Celebs सुद्धा पूर्वी होते लठ्ठ, PICS बघून व्हाल अवाक्

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूड अॅक्ट्रेस परिणीती चोप्रा हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 28 वर्षे पूर्ण केली आहेत. 22 ऑक्टोबर 1988 रोजी अंबाला, हरियाणा येथे जन्मलेल्या परिणीतीने 'लेडीज वर्सेस रिकी बहल' (2011) या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र तिला खरी ओळख ही 'इश्कजादे' या सिनेमातून मिळाली. परिणीतीने 'शुद्ध देसी रोमान्स', 'हंसी तो फंसी' आणि 'दावत ए इश्क' या सिनेमांमध्ये काम केले आहे. लवकरच तिचा 'मेरी प्यारी बिंदू' हा सिनेमा रिलीज होणारेय. पहिल्या सिनेमाच्या वेळी बरीच लठ्ठ होती परिणीती...

परिणीती 'लेडीज वर्सेस रिकी बहल' या सिनेमात लठ्ठ दिसली होती. मात्र या सिनेमानंतर आपली फॅन फॉलोइंग वाढवण्यासाठी परिणीतीने वजन कमी करण्याचे ठरवले. जेव्हा तिचा 'इश्कजादे' हा सिनेमा रिलीज झाला, तेव्हा तिच्यात बराच फरक दिसून आला होता. आता तर ती अगदी फिट झाली आहे.

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये एका मुलाखतीत परिणीती म्हणाली होती, "चार वर्षांपूर्वी मी जगासमोर एक लठ्ठ आणि चाइल्डिश मुलगी होती. आता चार वर्षांनी मला जे व्हायचे होते, ती मी झाली आहे. मी इतरांना आव्हान करते, की त्यांनीसुद्धा माझ्यासारखे फिट व्हावे. कारण मला विश्वास आहे, की जर मी फिट बॉडी बनवू शकते, तर तुम्हीसुद्धा नक्कीच करु शकता."
परिणीतीच नव्हे तर अनेक सेलिब्रिटी सिनेसृष्टीत येण्यापूर्वी बरेच लठ्ठ होते. यामध्ये अर्जुन कपूर, त्याची चुलत बहीण सोनम कपूर यांच्याही नावाचा समावेश आहे. सिल्व्हर स्क्रिनवर या स्टार्सची जादू चालत आहे. याशिवाय परिणीती चोप्रा, जॅकी भगनानी, अध्ययन सुमन ही यंग ब्रिगेडदेखील सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी बरीच लठ्ठ होती. मात्र आता त्यांनी आपले अव्वाच्यासवा वजन कमी केले आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या या स्टार्सविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...