आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहिदच्या आईपासून ते बिपाशाच्या नव-यापर्यंत, या 14 सेलेब्रिटींनी थाटले 3, 4 आणि 5 वेळा लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर येत्या 25 फेब्रुवारी रोजी वयाची 36 वर्षे पूर्ण करणार आहे. 1981 मध्ये जन्मलेला शाहिद हा प्रसिद्ध अभिनेते शाहिद कपूर आणि अभिनेत्री नीलिमा अझीम यांचा मुलगा आहे. शाहिदच्या जन्माच्या 4 वर्षांनी त्याच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता. 1985 मध्ये पंकज आणि नीलिमा हे कायदेशीररित्या विभक्त झाले. त्यानंतर 1989 मध्ये पंकज कपूर यांनी अभिनेत्री सुप्रिया पाठक यांच्यासोबत दुसरे लग्न थाटले. 

शाहिदच्या आईने केले तीनदा लग्न...  
शाहिद कपूरची बायोलॉजिकल आई आणि अभिनेत्री असलेल्या नीलिमा अझीम यांनी एकुण तीन लग्नं केली. पंकज कपूर यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर टीव्ही अभिनेते राजेश खट्टरसोबत त्यांनी दुसरे लग्न केले होते. 1990मध्ये दोघांचे लग्न झाले आणि 2001 साली ही जोडी विभक्त झाली. त्यानंतर 2004 मध्ये नीलिमा यांनी उस्ताद रजा अली खानसोबत निकाह केला. पण 2009 मध्ये हे लग्नही संपुष्टात आले.  

अनेक सेलेब्स अडकले तीनहून अधिक वेळा लग्नगाठीत...
बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत, ज्यांनी एकदा नव्हे तर तीन, चार आणि काहींनी पाच वेळा लग्नं केले. अभिनेता करणने 2008 मध्ये टीव्ही अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत पहिले लग्न केले. मात्र दहा महिन्यांतच दोघांचा काडीमोड झाला. त्यानंतर 2012 मध्ये त्याने त्याची को-स्टार जेनिफर विंगेटसोबत दुसरे लग्न केले. मात्र हे लग्नही टिकले नाही. 2014 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. 30 एप्रिल 2016 रोजी करणने बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूसोबत तिसरे लग्न केले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, दोनहून अधिक वेळा लग्न करणा-या 12 सेलिब्रिटींविषयी... 
बातम्या आणखी आहेत...