आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किशोर कुमारपासून ते शाहिद कपूरच्या आईपर्यंत, या 14 सेलेब्रिटींनी थाटले 3, 4 आणि 5 वेळा लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किशोर कुमार, नीलिमा अजीम आणि शाहिद कपूर - Divya Marathi
किशोर कुमार, नीलिमा अजीम आणि शाहिद कपूर
मुंबईः प्रसिद्ध गायक आणि अभिनेते किशोर कुमार यांना या जगाचा निरोप घेऊन 29 वर्षांचा काळ लोटला आहे. 13 ऑक्टोबर 1987 रोजी जगाला अलविदा करणारे किशोरदा केवळ अभिनयासाठीच नव्हे तर सिंगिंगसाठी ओळखले जायचे. त्यांच्या करिअरसोबतच पर्सनल आयुष्यसुद्धा खूप चर्चेत राहिले होते. त्यांनी चारदा लग्न थाटले होते.
किशोर कुमार यांचं पहिलं लग्न झालं ते बंगाली गायिका आणि अभिनेत्री रुमा गुहाबरोबर, पण या दोघांचा संसार अयशस्वी ठरला. यानंतर किशोर कुमार यांनी मधुबालाशी लग्न केलं, पण लगेचच मधुबालाचं निधन झालं. मधुबालाच्या मृत्यूनंतर किशोर कुमार यांनी योगिताबरोबर लग्न केलं. योगितापासूनही किशोर कुमार वेगळे झाले आणि मग त्यांनी लीना चंदावरकरशी लग्न केलं. शेवटच्या श्वासापर्यंत ते लीनासोबत राहिले होते.

अनेक सेलेब्स अडकले तीनहून अधिक वेळा लग्नगाठीत...
बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत, ज्यांनी एकदा नव्हे तर तीन, चार आणि काहींनी पाच वेळा लग्नं केले. शाहिद कपूरची आई आणि अभिनेत्री नीलिमा अजीम यांचेच उदाहारण घ्या. नीलिमा यांचे पहिले लग्न पंकज कपूरसोबत झाले. तर दुसरे लग्न अभिनेता राजेश खट्टरसोबत झाले. तिसरे लग्न त्यांनी उस्ताद रजा अली खानसोबत केले. मात्र त्यांचे तिन्ही लग्नं फार काळ टिकले नाही.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, दोनहून अधिक वेळा लग्न करणा-या 12 सेलिब्रिटींविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...