आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपूर्ण घराचे लाइट ऑन करुन झोपते सनी लिओनी तर गोविंदाचा झाला होता चेटकिणीशी सामना!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: काही महिन्यांपूर्वी 'परदेस में है मेरा दिल' या मालिकेच्या शूटिंगच्या निमित्ताने ऑस्ट्रियाला गेलेल्या टीव्ही अभिनेत्री दृष्टी धामीला तिथे भूताचा भास झाला होता. बॉलिवूड स्टार्सचा भूतावर विश्वास आहे का? किंवा त्यांचा सामना कधी भूताशी, चेटकिणीशी झाला होता का? त्यांना कशाची भीती वाटते? याविषी त्यांनी divyamarathi.comला एका बातचितमध्ये सांगितले होते. 

या बातचितमध्ये अभिनेत्री सनी लिओनीने सांगितले होते, की तुला भूताची एवढी भीती वाटते, की घरी एकटी असल्यास ती संपूर्ण घराचे लाइट ऑन करुन झोपते. तर गोविंदाने सांगितल्यानुसार, त्याचा चक्क चेटकिणीशी सामना झाला होता. 

भूतावर आधारित चित्रपटांना घाबरते सनी लिओनी 
सनी लिओनीने सांगितल्यानुसार, ती भूतांच्या चित्रपटांना घाबरते. ती म्हणाली, 'मी रागिनी एमएमएस 2' मध्ये काम केले. पण प्रत्यक्षात मला कधीही भूत दिसले नाही किंवा त्याचा भाससुद्धा झाला नाही. पण आजवर असे अनेक किस्से ऐकले आहेत, जे ऐकून प्रत्यक्षात भूत असतो, यावर माझा विश्वास आहे." सनी पुढे म्हणाली, "जेव्हा कधी मी एखादा भूताचा चित्रपट बघते, तेव्हा नव-यामागे किंवा चादरेत तोंड लपवून तो बघत असते. मला सर्वात जास्त भीती अंधाराची वाटते. म्हणून मी संपूर्ण घराचे लाइट ऑन करुन झोपत असते."

गोविंदाच्या छातीवर बसली होती चेटकिण...
भूतांविषयीचा अनुभव शेअर करताना गोविंदाने सांगितले होते, "होय, मला भूतांची भीती वाटते. प्रत्यक्षात भूत असतात, यावर माझा विश्वास आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्षात मी भूत पाहिला आहे. तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. कारण आपण मनुष्यासोबत लढू शकतो, पण भूतांना सामोरे जाणे अशक्य आहे. या कारणाने मी भूतांना घाबरतो."

एक अनुभव शेअर करताना गोविंदाने सांगितले, "काही वर्षांपूर्वी आम्ही पहाडी भागात चित्रपटाचे शूटिंग करत होतो. मी ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो, तेव्हा मला विचित्र भास होत होते. एकदा मी भासांकडे दुर्लक्ष केले आणि माझ्या खोलीत जाऊन झोपलो. अचानक रात्री मला जाग आली तेव्हा बघतो काय तर एक म्हातारी स्त्री माझ्या छातीवर बसली होती. हे बघून मी खूप घाबरलो. मी माझ्या शेजारचा नाइट लँप लावला. पहिले मला भास होतोय, की काय असे वाटले. पण उठल्यावर पाहतो तर काय मी झोपताना अस्तव्यस्त असलेले सामान अगदी त्याच्या जागेवर लावले होते. हे बघून मी खूप घाबरलो होतो. मी तेथून पळ काढला आणि मुंबईत परतो. तो दिवस मी कधीच विसरु शकत नाही."

पुढे वाचा, बिपाशा बसू, करीना कपूर आणि इतर सेलेब्स काय म्हणाले...  
बातम्या आणखी आहेत...