आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'K3G' ची छोटी करीना, 'KKHH' ची अंजली, आता असे दिसतात Child Artist

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूड सिनेसृष्टीत असे अनेक बालकलाकार आहेत, ज्यांनी अगदी कमी वयातच आपल्या अभिनय आणि खट्याळ अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. बालपणी हे स्टार्स जेवढे क्यूट दिसले तेवढेच मोठे होऊन ते हँडसम आणि ग्लॅमरस दिसत आहेत.
बालपणी या लिटिल स्टार्सनी आपल्या अॅक्टिंगच्या बळावर प्रसिद्धी मिळवली. यापैकी आता तर काही लीड रोलमध्ये झळकण्याची तयारी करत आहेत. आता हे स्टार्स मोठे होऊन कसे दिसतात, याचाच विचार तुमच्या मनात आला असेल ना. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बालकलाकारांविषयी सांगत आहोत, ज्यांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षक बघू इच्छितात.
मालविका राज (छायाचित्रात वर)
सिनेमे : शिकार, कभी खुशी कभी गम
'कभी खुशी कभी गम' या सिनेमात करीना कपूरच्या बालपणीची 'पू' ही व्यक्तिरेखा साकारणारी मालविका राज आता खूप ग्लॅमरस दिसते. मालविकाने 2010 मध्ये मिस इंडिया स्पर्धेत टॉप 10 मध्ये स्थान मिळवले होते. याशिवाय मोंटे कार्लो फॅशन शोमध्येही ती सहभागी झाली आहे. मालविका अभिनेत्रीसोबतच नॅशनल लेवल फुटबॉल प्लेअरसुद्धा आहे. सध्या ती बॉलिवूड सिनेमांमध्ये येण्याची तयारी करत आहे. अभिनेत्री अनीता राज यांची ती भाची आहे.
सना सईद (छायाचित्रात खाली)
सिनेमे : हर दिल जो प्यार करेगा, बादल, कुछ-कुछ होता है, स्टूडंट ऑफ द ईयर
मालिका : बाबुल का आंगन छूटे ना, झलक दिखला जा-6, ये है आशिकी, फॉक्स किड्स
'कुछ कुछ होता है' या सिनेमात शाहरुखची मुलगी अंजलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सना सईद आता ग्लॅमरस दिसते. सनाने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमाव्यतिरिक्त अनेक जाहिरातींमध्येही काम केले आहे. सिनेमांशिवाय सना काही दिवसांपूर्वी 'नच बलिए 7' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये बॉयफ्रेंड दीपेश पटेलसोबत सहभागी झाली होती.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, सिनेमांमध्ये झळकलेल्या आणखी काही बालकलाकारांविषयी...