आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहेलपासून आमिरपर्यंत, या 7 बॉलिवूड CELEBS नी घरातून पळून जाऊन थाटले होते लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सलमान खानचा 'ट्युबलाइट' हा सिनेमा येत्या 23 जून रोजी रिलीज होतोय. दिग्दर्शक कबीर खान यांच्या या सिनेमात सलमानचा धाकटा भाऊ सोहेल खान याची एक महत्त्वाची भूमिका आहे. 2010 साली आलेल्या 'राख' या सिनेमात सोहेल शेवटचा झळकला होता. सोहेल अभिनेत्यासोबतच निर्माता असून 46 वर्षांचा आहे. 20 डिसेंबर 1969ला जन्मलेल्या सोहेलने 2002मध्ये आलेल्या 'मैने दिल तुझको दिया' सिनेमातून करिअरला सुरुवात केली. अभिनेता म्हणून सोहेल अपयशी ठरला. सोहेलने दिग्दर्शन आणि प्रॉडक्शनची धुरा सांभाळली. सोहेल खानने कधीकाळी पळून जाऊन लग्न केले होते.
 
1. सिनेमा रिलीज होण्याच्या दिवशीच पळून जाऊन केले लग्न-
सोहेल खान आपल्या पर्सनल लाइफमुळे सर्वाधिक चर्चेत राहिला. त्याचा हिंदु तरुणी सीमा सचदेववर जीव जडला होता. दोघांचे कुटुंबीय या लग्नाच्या विरोधात होते. त्यामुळे त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. सूत्रांच्या सांगण्यानुसार, ज्यादिवशी 1998मध्ये 'प्यार किया तो डरना क्या' सिनेमा रिलीज झाला होता, त्याच दिवशी दोघांनी पळून जाऊन लग्न केले होते. असो, आज दोघे सुखी आयुष्य जगत आहेत. त्यांना निर्वाण आणि योहान ही दोन मुलेदेखील आहेत. सोहेलची पत्नी सीमा फॅशन डिझाइनर आहे.
 
2. आमिर आणि रिना वेगवेगळ्या धर्माचे असल्याने कुटुंबीय होते लग्नाच्या विरोधात... 
अभिनेता आमिर खानने दोनदा लग्न केले आहे. सध्या तो दुसरी पत्नी किरण रावसोबत राहतो. आमिरची पहिली पत्नी रिना दत्ता आहे. रिना आमिरच्या शेजारी राहत होती. दोघांना एकमेकांवर प्रेम झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघे वेगळ्या धर्माचे असल्याने रिनाचे कुटुंबीय या लग्नासाठी नकार देत होते. दोघांच्या घरातून विरोधच होत राहिला. अखेर त्यांनी 18 एप्रिल 1986ला घर सोडून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. 16 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर 2002मध्ये आमिरने रिनाला घटस्फोट दिला आणि डिसेंबर 2005मध्ये किरण रावसोबत दुसरे लग्न केले. रिना आणि आमिरला दोन मुले (जुनैद आणि इरा) आहे. तर आमिर-किरणला आझाद हा मुलगा आहे.  

सोहेल-आमिरप्रमाणेच बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आहेत, ज्यांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन पळून जाऊन लग्न केले. कोण आहेत, हे सेलिब्रिटी जाणून घ्या पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...