आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Couples Who Did Not Shy Away From Living in Together

अफेअर असो वा लग्न, प्रेम पडताळण्यासाठी बिनधास्तपणे लिव्ह इनमध्ये राहिले हे 13 सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः आज आपल्या समाजात लिव्ह इन रिलेशनशिप सामान्य बाब झाली आहे. असे म्हटले जाते, की बलिवूडमध्ये राज बब्बर आणि स्मिता पाटील यांनी लिव्ह इन रिलेशनशिपला सुरुवात केली. तसे पाहता स्टार्सचे खासगी आयुष्य नेहमीच लाइमलाइटमध्ये असते. त्यामुळे हे कलाकार कुणासोबत डेट करतात, कुठे फिरतात, कुणासोबत राहात आहेत, या सर्वांची बरीच चर्चा रंगत असते.

ऐंशीच्या दशकात मात्र लिव्ह इनमध्ये राहणे हे मोठे धाडसी पाऊल होते. राज बब्बर यांनी समाजाच्या सर्व बंधनांना झुगारुन स्मिता पाटील यांच्यासह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे धाडस दाखवले. यामुळे त्यांच्यावर बरीच टीकासुद्धा झाली. काही दिवसांनी राज आणि स्मिता यांनी लग्नदेखील केले.

आताच्या काळात तर बॉलिवूडमध्ये लिव्ह-इनमध्ये राहणे कल्चर बनले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आता तर काही वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर ब-याच सेलेब्सनी आपले नाते संपुष्टात आणले. तर काहींनी काही वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर लग्न केले.
करीना कपूर आणि सैफ अली खान
करीना कपूर खानची बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी गणना होते. लग्नापूर्वी करीना सैफसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. पाच वर्षे डेटिंग केल्यानंतर या दोघांनी आपल्या नात्याची सार्वजनिकरित्या कबूली दिली. लिव्ह इनमध्ये राहण्यासाठी सैफने करीनाच्या आईकडे परवानगी मागितली होती. करीनाच्या आईने परवानगी दिल्यानंतर हे दोघे चार वर्षे लिव्ह इनमध्ये राहिले आणि ऑक्टोबर 2012मध्ये लग्नबेडीत अडकले. लिव्ह इन रिलेशनशिप हे मॉर्डन इंडियाचे सत्य असल्याचे करीनाचे म्हणणे आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, बी टाऊनचे आणखी कोणकोणते सेलिब्रिटी लग्नाच्या बंधनात न अडकता बिनधास्तपणे एकत्र राहिले होते...