Home »Gossip» Bollywood Couples Who Were In Live In Relationship

आदित्य-कंगनाबद्दल सर्वांनाच माहिती आहे, वाचा B Town च्या इतर Live-In कपल्सविषयी

दिव्य मराठी वेब टीम | Sep 12, 2017, 09:00 AM IST

एंटरटेनमेंट डेस्क - कंगनाने दिलेल्या मुलाखतीनंतर पुन्हा एकदा तिच्या आणि आदित्य पांचोलीच्या रिलेशनशिपबाबत चर्चा सुरू झाली आहे. कंगना आणि आदित्य काही दिवस लिव्ह इन मध्ये राहिल्याचे समोर आले आहे.

झरीना वहाबसोबत लग्न केल्यानंतर काही वर्षांनी आदित्य पांचोलीच्या आयुष्यात त्याच्यापेक्षा वयाने 22 वर्षे लहान असलेल्या कंगना रनोटची एन्ट्री झाली होती. कंगना त्यावेळी सिनेसृष्टीत संघर्ष करत होती. तर आदित्य तिचा मेंटर होता. त्यावेळी कंगना केवळ 18 वर्षांची होती. दोघे बरेच दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही राहिले. याचा परिणाम आदित्यच्या वैवाहिक आयुष्यावर पडला. कंगनासोबत ब्रेक्रप झाल्यानंतर आदित्यने तो तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता, याची कबुली दिली होती. त्यामुळे आपल्या कौटुंबिक आयुष्यावर त्याचा परिणाम झाल्याचेही त्याने तेव्हा मान्य केले होते.

बॉलिवूडविषयी बोलायचे झाल्यास आजच्या काळात येथे लिव्ह-इनमध्ये राहणे कल्चर बनले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. काही वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर ब-याच सेलेब्सनी आपले नाते संपुष्टात आणले. तर काहींनी काही वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर लग्न केले.

आदित्य आणि कंगनाप्रमाणेच आणखी कोणकोणते सेलेब्स लिव्ह इनमध्ये होते आणि पुढे त्यांच्या नात्याचे काय झाले.. जाणून घ्या पुढील स्लाइड्सवर...

Next Article

Recommended