आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 कपल्स : लग्नानंतर कुणी 25, कुणी 2 तर कुणी 50 वर्षांपासून निभावताहेत जोडीदाराची साथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या लग्नाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. 25 ऑक्टोबर 1991 ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकली. ही जोडी बॉलिवूड कलाकरांमधील एक यशस्वी जोडी मानली जाते. वयाच्या 19 वर्षीच शाहरुख 14 वर्षांच्या गौरीच्या प्रेमात पडला. तेव्हापासून आतापर्यंत दोघांचे नाते मैत्री आणि प्रेमाने टिकून आहे. सार्वजनिक ठिकाणीसुध्दा दोघांची प्रेम दिसून येते. दोघांना तीन मुले आहेत. थोरला मुलगा आर्यन, धाटका मुलगा, अबराम आणि मुलगा सुहाना.
बी-टाऊनमध्ये नात्यांचा कालावधी काही महिने अथवा वर्षांचा असतो. तसेच काही जोड्या अशाही आहेत ज्या आपले नाते गेल्या काही वर्षांपासून जपत आहेत. नेहमीच आपले नाते उत्कृष्ट असल्याचे त्यांनी जगासमोर दाखवले आहे. या जोड्यांमध्ये बॉलिवूडचे महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन-जया, जावेद-शबाना, दिलीप कुमार-सायरा बानो यांची नाव सामील आहेत. तसेच, सध्याच्या पिढीचे शाहरुख-गौरी, मलायका-अरबाज खान यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.
प्रेरणादायी आहे शाहरुख आणि गौरीची लव्ह स्टोरी…
लग्न- 1991, 25 वर्षे

बॉलिवूडची सर्वात आकर्षक जोडी म्हणून शाहरुख खान आणि गौरी खान यांना ओळखले जाते. या दोघांची प्रेमकहाणी प्रत्येक जोडप्यासाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. या दाम्पत्याने खूप कष्टातून यशोशिखर गाठले आहे. शाहरुख आणि गौरीचे लग्न 1991 मध्ये झाले होते. गौरीने आपल्या कुटुंबीयांच्या मनाविरुद्ध जाऊन शाहरुखसह लग्न केले आणि यशस्वी संसार करुन दाखवला. या दाम्पत्याच्या लग्नाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत.

जॅकी श्रॉफ-आयशा
लग्नः 1987, 29 वर्षे
आयशा राजघराण्यातील आहे. अतिशय श्रीमंतीत तिचे बालपण गेले होते. मात्र जॅकीवरच्या प्रेमापोटी तिने त्याच्यासोबत चाळीत संसार थाटण्याची तयारी दाखवली. तिने जॅकीसाठी अनेक त्याग केले. गेल्या 29 वर्षांपासून ही जोडी गुण्यागोविंदाने संसार करत आहे. या दोघांना टायगर आणि कृष्णा ही दोन मुले आहेत. टायगर बॉलिवूडमध्ये करिअर करत आहे. तर कृष्णाची अद्याप सिनेसृष्टीत पदार्पणाची इच्छा नाहीये.

पुढील स्लाईड्समध्ये वाचा, अमिताभ-जया, धर्मेंद्र-हेमामालिनीपासून ते अजय-काजोलपर्यंत का खास आहे या सेलिब्रिटींचे लग्न...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...