आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Fashion Diva Mugdha Godse Turn 34 Today

B'day: एकेकाळी पेट्रोल पंपावर काम करायची ही अभिनेत्री, 'Fashion' मुळे झाली फेमस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री मुग्धा गोडसे - Divya Marathi
अभिनेत्री मुग्धा गोडसे

मधुर भंडारकर दिग्दर्शित 'फॅशन' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या या अभिनेत्रीचा प्रवास मुळीच सोपा नव्हता. आम्ही बोलतोय ती प्रसिद्ध मॉडेल म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणा-या मुग्धा गोडसेबद्दल. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली मुग्धा एकेकाळी पेट्रोल पंपावर तेल विकून केवळ 100 रुपयांमध्ये आपला उदरनिर्वाह करायची. तर पॉकेट मनीच्या रुपात घरुन तिला केवळ 300 रुपये मिळायचे. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी मुग्धा लहान-मोठे काम करायची.
मुग्धाचे खासगी आयुष्य...
पुण्यात जन्मलेल्या मुग्धाचा जन्म 26 जुलै 1982 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. पुण्यातील नुतन मराठी विद्यालयात तिने मराठी माध्यमांत शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यातीलच विद्यालयातून तिने कॉमर्समध्ये डिग्री प्राप्त केली. तिला एक बहीण असून तिचे नाव मधुरा आहे. इकॉनॉमिक्स हा तिचा आवडता विषय आहे. नवनवीन मित्र बनवणे, डिस्को फन करणे तिला पसंत आहे.
आज मुग्धा आपला 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिचा सेल्सगर्लपासून बॉलिवूड दिवा होण्यापर्यंतच्या प्रवासाविषयी सांगत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या तिच्या प्रवासाविषयी आणि पाहा तिची खासगी आयुष्यातील खास छायाचित्रे...
(नोट - सर्व छायाचित्रे मुग्धा गोडसेच्या ऑफिशिअल फेसबुक पेजवरुन घेण्यात आली आहेत.)