Home »Gossip» Bollywood Film Producer Raj Kapoor Give Negative Feedback To Actress Zarina Wahab

या अॅक्ट्रेसला राज कपूर म्हणाले होते, 'कधीही बनू शकणार नाही हीरोईन'

दिव्य मराठी वेब टीम | Jul 17, 2017, 16:13 PM IST

शोमॅन राज कपूर यांनी एका तरुणीविषयी म्हटले होते, की ती कधीही अभिनेत्री बनू शकणार नाही आणि तिला सिनेमांच्या ऑफर्ससुद्धा मिळणार नाहीत. पण त्या तरुणीने राज कपूर यांना चुकीचे सिद्ध केले आणि सिनेसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री जरीना वहाब यांच्याविषयी. आज (17 जुलै) त्यांचा वाढदिवस असून त्यांनी वयाची 58 वर्षे पूर्ण केली आहे. सावळ्या रंगाच्या जरीना यांनी दिग्दर्शक बासू चॅटर्जींच्या 'चितचोर' (1976) मध्ये उत्कृष्ट अभिनेय केला होता.

बॉलिवूडमध्ये नाव कमावणार, जरीना यांनी केला होता दृढ निश्चय...
FTII येथून अभिनयाचे धडे गिरवणा-या जरीना यांच्यासाठी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणे एवढे सोपे नव्हते. बातम्यांनुसार, शो मॅन राज कपूर यांच्याकडून मिळालेल्या नकारात्मक प्रतिसादानंतर जरीना यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याचा दृढ निश्चय केला होता. त्यानंतर जरीना यांनी पेज थ्री पार्टी आणि इव्हेंटमध्ये हजेरी लावायला सुरुवात केली. 1974 साली 'इश्क, इश्क, इश्क' हा त्यांचा पहिला सिनेमा रिलीज झाला. पण त्यांची अभिनयाची सुरुवात दमदार ठरली नाही. 1975 साली त्यांचा आणखी एक सिनेमा रिलीज झाला, त्याचे नाव होते 'अनोखा'. हा तेलगू सिनेमा होता. या सिनेमांमध्ये त्यांना यश मिळू शकले नाही.

पुढे वाचा, कसा झाला जरीना वहाब यांचा सिनेसृष्टीतील प्रवास...

Next Article

Recommended