मुंबई- अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि इरफान खान अभिनीत 'पिकू' या आगामी सिनेमाविषयी चर्चेत आले आहेत. सिनेमाचा ट्रेलर लोकांनी खूप पसंत केला. सुजीत सरकार दिग्दर्शित 'पिकू' सिनेमा वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित आहे.
'पिकू' अर्थातच दीपिका पदुकोण आणि तिच्या आगळ्या-वेगळ्या बाबांची भूमिका पार पाडणारे अमिताभ बच्चन यांच्या भोवती सिनेमाची कहानी गुंफण्यात आली आहे. 'पिकू' दिल्ली एक मॉडर्न तरुणी आहे, ती
आपल्या डिमांडिंग वडिलांचा सांभाळ करते. सिनेमात इरफान खानने एका आर्किटेक्टचे पात्र साकारले आहे. तो पिकूला आणि तिच्या वडिलांना कोलकात्याला घेऊन जातो.
बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा अशा विषयावर भाष्य करण्यात आले आहे, असे नाहीये यापूर्वीसुध्दा वडील-मुलीचे नाते सिनेमांतून दर्शवण्यात आले आहे.
divyamarathi.com तुम्हाला आज बॉलिवूडमधील वडील-मुलांच्या नात्यावर आधारित सिनेमाविषयी सांगणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कोण-कोणते सिनेमा आहेत जे वडील-मुलीच्या नात्यावर आधारित आहेत...