आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कुछ कुछ होता है' ते 'बाजीराव मस्तानी', ऐश्वर्याने धुडकावून लावले हे Blockbuster सिनेमे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्क: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा मोस्ट अवेटेड ऐ दिल है मुश्किल हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सिनेमात रणबीर आणि ऐश्वर्याचे इंटीमेट सीन्स आहेत. असे म्हटले जाते, की सिनेमातील ऐश्वर्या आणि रणबीरच्या किसींग सीन्समुळे बच्चन फॅमिली ऐश्वर्यावर नाराज आहे. ऐश्वर्याने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. परंतु तिच्या चाहत्यांना कदाचित माहित असेल, की तिने अनेक सुपरहिट सिनेमे धुडकावूनसुद्धा लावले आहेत. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर विक्रम रचले आहेत. करण जोहरचा 'कुछ कुछ होता है' आणि 'कभी खुशी कभी गम'सारखे सिनेमे आधी ऐश्वर्याला ऑफर झाले होते. परंतु काही कारणास्तव तिने या सिनेमांत काम करण्यास नकार दिला.

जाणून घ्या ऐश्वर्याने का नाकारला होता करण जोहरचा सिनेमा...
ऐश्वर्याने एका प्रसिध्द वर्तमानपत्रासोबत बातचीत करताना सांगितले, की तिने करण जोहरचा सिनेमा का नाकारला होता. ऐश्वर्याने सांगितलेल्या माहितीनुसार, 'मला 'कुछ कुछ होता है' सिनेमा ऑफर झाला तेव्हा ती अमेरिकेत 'आ अब लौट चले' सिनेमाच्या 40 दिवसांच्या शूटिंग शेड्यूलमध्ये बिझी होते. दिग्दर्शक चिंटू अंकलचा (ऋषी कपूर) तो पहिला सिनेमा होता. मी त्यांची खूप मोठी फॅन आहे. त्यांच्यासोबत काम करणे मी मिस करू शकत नव्हते. त्यावेळी करणने मला 'कभी खुशी कभी गम'च्या कलाकार आणि कथेविषयी सांगितले होते. परंतु आम्ही एकत्र काम करू शकलो नाहीत. तो त्याच्या अनेक सिनेमांच्या कथा मला ऐकवत असतो. आम्ही एका कुटुंबातील सदस्यासारखे आहोत.'

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या ऐश्वर्याने कोण-कोणते ब्लॉकब्लस्टर सिनेमे नाकारले...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...