आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिपस्टीकच नव्हे बॉलिवूडच्या मोठ्या स्टार्सचे हे चित्रपटही रिलीजपूर्वीच अडकले आहेत वादात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रकाश झा यांची निर्मिती असलेला आणि अलंकृता श्रीवास्तव दिग्दर्शित 'लिपस्टिक अंडर माय बुर्का' चित्रपट अखेर रिलीज झाला आहे. हा चित्रपट इंटिमेट सीन्स आणि सेंसॉर बोर्डाची हिरवी झेंडी मिळाली नसल्याने वादात अडकला होता. पण रिलीजपूर्वी वादात अडकणारा हा काही पहिलाच बृलिवूडचा सिनेमा नाही. यापूर्वीही बृलिवूडच्या अनेक ए-लिस्टर्स (सलमान, शाहरुख आणि  आमिर) चे चित्रपट वादात अडकले आहेत. अशाच ताही चित्रपटांबाबत आपण आज माहिती घेणार आहोत. 
 
सुल्तान
स्टारकास्ट : सलमान खान, अनुष्का शर्मा, रणदीप हुड्डा, अमित साध.
सुल्तान (2016) चित्रपट रिलीज होण्यापूर्वी गायक अरिजित सिंह आणि सलमान यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर सलमानने त्याचे गाणे हटवून राहत फतेह अली खानला गायला लावले. त्यानंतर सलमानने 'सुल्तान' च्या शुटिंगदरम्यानचे परिश्रम आणि थकावट याची तुलना रेप पीडित महिलेशी केली. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी सलमान म्हणाला होता की, शूटिंग दरम्यान जेव्हा मी 120 किलोच्या पहिलवानाला उचलून खाली पाडतो, आणि असे मी 10 वेळा करतो तेव्हा ते फार कठीण असते. शुटिंगनंतर जेव्हा मी रिंगमधून बाहेर यायचो तेव्हा एखादी रेप पीडित महिला चालली असावी असे वाटायचे. 
 
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, वादात अडकलेल्या अशाच इतर 11 चित्रपटांबाबत.. 
 
बातम्या आणखी आहेत...