आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood On Screen Lovers Who Also Played Brother And Sister In Movies

बॉलिवूड कपल्स: कधी सिनेमांमध्ये बनले बहीणभाऊ, तर कधी लव्हर्स बनून केला रोमान्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('दिल धडकने दो' आणि 'गुंडे'मध्ये रणवीर सिंह-प्रियांका चोप्रा, 'जोश' आणि 'देवदास'मध्ये शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय)
मुंबईः झोया अख्तर दिग्दर्शित 'दिल धडकने दो' हा सिनेमा गेल्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला. अनिल कपूर, शेफाली शाह, रणवीर सिंह, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, फरहान अख्तर आणि राहुल बोस स्टारर या सिनेमाने रिलीजच्या सहा दिवसांत 52.39 कोटींचा व्यवसाय केला आहे. शुक्रवारी 10.53 कोटी, शनिवारी 12.27 कोटी, रविवारी 14.25 कोटी, सोमवारी 5.77 कोटी, मंगळवारी 5.09 कोटी आणि बुधवारी 4.48 कोटींचा सिनेमाचा व्यवसाय झाला.
विशेष म्हणजे या सिनेमात रणवीर आणि प्रियांकाने बहीणभावाची भूमिका साकारली आहे. यापूर्वी ही जोडी एका सिनेमात झळकली होती. मात्र त्यामध्ये त्यांनी प्रियकर-प्रेयसीची भूमिका वठवली होती. आम्ही बोलतोय ते गेल्या वर्षी रिलीज झालेल्या दिग्दर्शक अली अब्बार जफरच्या 'गुंडे' या सिनेमाविषयी. या दोघाव्यतिरिक्त अभिनेता अर्जुन कपूर सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला होता.
तसे पाहता, पडद्यावर प्रियकर-प्रेयसीची भूमिका वठवणारे कपल्स नंतर सिनेमातच बहीणभावाच्या रुपात दिसण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. यापूर्वीही अनेक सेलिब्रिटींनी अशा भूमिका वठवल्या आहेत. अमिताभ बच्चन-हेमा मालिनी असो किंवा शाहरुख खान-ऐश्वर्या राय बच्चन असो, वा सलमान खान आणि नीलम असो, या कलाकारांनी पडद्यावर लव्हर्ससोबतच बहीण-भावाची भूमिका निभावली आहे.
Divyamarathi.com आज तुम्हाला अशाच काही सेलिब्रिटींविषयी सांगत आहे...
शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन
>> दोघांनी 2000 मध्ये रिलीज झालेल्या 'जोश' या सिनेमात बहीणभावाची भूमिका साकारली होती. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे 2002 मध्ये रिलीज झालेल्या 'देवदास'मध्ये दोघे प्रियकर-प्रेयसीच्या रुपात दिसले होते.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या आणखी अशाच 4 कपल्सविषयी...