Home »Gossip» Bollywood Rakhi Brothers And Sisters

सोनू-ऐश्वर्या तर सलमान हिच्याकडून बांधतो राखी, हे आहेत बॉलिवूडचे राखी भावंडे

दिव्य मराठी वेब टीम | Aug 07, 2017, 11:32 AM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये बहीण भावांड्या अनेक जोड्या आहेत. जे रियल बहीण भाऊ नसतानाही या हे नाते जपतात. त्यामुळेच रक्षाबंधनच्या दिवशी हे सेलेब्स त्यांच्या राखी भावंडांना भेटायला विसरत नाहीत. यात सलमान-श्वेता रोहिरा, ऐश्वर्या राय-सोनू सूद, बिपाशा बासू-रॉकी एस, साक्षी तंवर-अली असगर आणि तमन्ना भाटिया-साजिद खान अशा जोड्यांचा समावेश आहे. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला सांगत आहोत, बॉलिवूडच्या अशा जोड्यांबाबत आम्ही आज सांगणार आहोत, जे सख्खे भाऊ बहिणी नसतानाही, रक्षाबंधन साजरा करायला कधीही विसरत नाहीत.

ऐश्वर्या राय आणि सोनू सूद
अॅक्टर सोनू सूदला ऐश्वर्या राय राखी बांधते. आशुतोष गोवारीकर यांच्या ‘जोधा-अकबर’चित्रपटात सोनू सूद आणि ऐश्वर्या भाऊ-बहिणीच्या भूमिकेत होते. चित्रपटाच्या काळात ऐश्वर्याने सोनू सूदला राखी बांधली होती. तोव्हापासून आतापर्यंत सोनू दरवर्षी ऐश्वर्याकडून राखी बांधून घेतो. सोनूच्या मते ऐश्वर्यासाठी माझ्या मनात कायम आदर राहिलेला आहे. बॉलिवूडमध्ये नाती टिकत नाहीत. पण आमचे बावा बहिणीचे नाते कायम आहे, याचा मला आनंद आहे.
श्वेता रोहिरा आणि सलमान खान
सलमानच्या जीवनात अर्पिता आणि अलविरा यांच्याशिवाय आणखी एक बहीण आहे. तिच्याशिवाय फार लोकांना माहिती नाही. 'सनम रे' फेम अॅक्टर पुलकित सम्राट याची एक्स वाईफ असलेली श्वेता रोहिरा सलमानला राखी बांघते. श्वेता मुंबईतील एक सिंधी गर्ल असून, लहानपणीपासून तिच्यावर सलमानचा प्रभाव होता. एक दिवस ती सलमानच्या घरी पोहोचली आणि त्याच्या आईला म्हणाली, की मला सलमानला राखी बांधायची आहे. मग काय सलमानने लगेचच होकार दिला आणि तेव्हापासून सलमान दरवर्षी तिच्याकडून राखी बांधून घेतो. सलमान श्वेताला सख्ख्या बहिणीप्रमाणे मानतो. सलमाननेच लग्नात तिचे कन्यादानही केले होते.
पुढील स्लाइड्सवर वाचा, बॉलिवूडमधील इतर राखी बहीण-भावांबाबत...

Next Article

Recommended