आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे दलेर मेंहदीचा मुलगा आणि NRI सून, एकाच सिनेमात झळकले आहेत दोघे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियानाः पंजाबी गायक दलेर मेंहदी यांचा मुलगा गुरदीप आणि जेसिका सिंग यांच्या लग्नाला नुकतचं एक वर्ष पुर्ण झालंय. फिनलॅण्ड या युरोपियन देशात अगदी थाटात दोघांचे लग्न झाले होते. या लग्नाला मेंहदी दलेरच्या कुटुंबीयांसोबत त्यांचे काही जवळचे मित्र सहभागी झाले होते.  दलेर मेहंदी यांची सून एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. बॉलिवूड सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. विशेष म्हणजे या फिल्ममध्ये ती गुरदीपसोबत झळकली आहे. 
 
मॉडेलसोबत अॅक्ट्रेस आहे जेसिका...
- फिनलॅण्डमध्ये जन्मलेली जेसिका मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती मिस इंडिया युरोप या सौंदर्य स्पर्धेची पहिली रनरअप ठरली होती.
- लग्नापूर्वी जेसिकाने गुरदीपसोबत सिनेमात काम केले होते. हे दोघे  'दिल्ली 1984' या सिनेमात लीड रोलमध्ये झळकले होते.
- या दोघांनी लग्नाच्या वर्षभराआधी साखरपुडा केला होता.  
- रिपोर्ट्सनुसार, गुरदीप आणि जेसिका यांचे लव्ह मॅरेज आहे.

गुरदीपने बॉलिवूडमध्ये केलंय डेब्यू... 
- वडील दलेर मेहंदीप्रमाणेच गुरदीप सिंगर  आणि अॅक्टर आहे. 
- 2014 साली रिलीज झालेले त्याचे 'सहेली' हे गाणे  हिट ठरले होते. त्याने भारतासोबतच परदेशात अनेक ठिकाणी स्टेज परफॉर्मन्स केले आहेत.  
- 2013 साली सईद नूर  यांच्या 'मेरी शादी कराओ' या सिनेमाद्वारे गुरदीपने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
- या सिनेमात गुरदीप लीड रोलमध्ये होता. त्याच्यासोबत राधिका वैद्य ही अभिनेत्री झळकली होती.

पुढील स्लाईड्सवर बघा, जेसिका आणि गुरदीप यांचे खास Photos... 
बातम्या आणखी आहेत...