आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Star Shilpa Shetty Sold Her Burj Khalifa Apartment

PHOTOS: दुबईतील बुर्ज खलीफातील अपार्टमेंटची शिल्पाने केली विक्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः दुबईस्थित बुर्ज खलीफा येथील अपार्टमेंट, इनसेटमध्ये शिल्पा पती राज कुंद्रासोबत)
मुंबईः शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा पुन्हा एकदा आयपीएलच्या तयारीला लागले आहेत. सोमवारी त्यांनी आयपीएल लिलावात ऑलराऊंडर क्रिस्टोफर मोरिसला सामन्यासाठी विकत घेतले. आयपीएलमध्ये शिल्पा आणि राज राजस्थान रॉयल्स या टीमचे मालक आहेत. त्यांनी क्रिस्टोफरसाठी 1 कोटी 40 लाखांची बोली लावली आणि त्याला सामन्यासाठी विकत घेतले. आता राजस्थान रॉयल्सकडे 12 कोटी 75 लाखांची रक्कम शिल्लक आहे. या पैशांतून ते आणखी खेळाडूंची खरेदी करण्याची शक्यता आहे.
आयपीएलमध्ये कोटींची बोली लावून खेळाडू विकत घेणा-या राज आणि शिल्पा यांनी अलीकडेच त्यांचे दुबईतील बुर्ज खलीफा या सर्वात उंच इमारतीत असलेले आपले अपार्टमेंट विकेल आहे. हे अपार्टमेंट खूप लहान असल्यामुळे त्याची विक्री केल्याचे शिल्पाने सांगितले. सोबत मुलगा विवानला येथे खेळायला जागा नसल्याचे शिल्पाचे मत होते.
राज कुंद्रा यांनी हे अपार्टमेंट शिल्पाला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेट म्हणून दिले होते. बुर्ज खलीफा ही जगातील सर्वात उंच इमारत असून याच्या 19व्या मजल्यावर शिल्पाचे अपार्टमेंट होते. या इमारतीत एकुण 160 मजले असून वन, टू, थ्री आणि फोर बेडरुमचे तब्बल 900 अपार्टमेंट येथे आहेत.
पुढील स्लाईड्मसध्ये पाहा शिल्पाने विक्री केलेल्या बुर्ज खलीफातील तिच्या अपार्टमेंटची झलक...