आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नापूर्वीच्या सेक्सवर बिनधास्त आणि रोखठोक मतं मांडतात हे 18 बॉलिवूड सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड कलाकार कोणत्याही मुद्यांवर बिनधास्त आपले मत मांडतात. मात्र काही कलाकार मौन बाळगणेच पसंत करतात. पण सेक्सविषयी बोलायचे झाले तर यातही अनेक कलाकारांनी मनमोकळ्या आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेहमी बोल्ड विषयांवर मौन बाळगणारे कलाकारसुध्दा याविषयी खुलेआम बोलले आहेत.काही दिवसांपूर्वीच अभिनेता सलमान खानने स्वतःला व्हर्जिन अर्थातच कौमार्यात असल्याचे सांगितले होते. खरं तर सलमानचे लग्न हा संपूर्ण बॉलिवूडसमोर असलेला मोठा प्रश्न आहे. त्याच्या प्रेयसींची यादी मोठी असली तरी तो अजून ‘व्हर्जिन’ (कौमार्य) असून, त्याने स्वतःला आपल्या होणा-या पत्नीसाठी वाचवून ठेवले असल्याचे तो म्हणाला आहे. यावर्षीच्या शेवटी सलमान त्याची प्रेयसी लुलियासोबत लग्न करणार असल्याची चर्चा आहे.
तर अभिनेत्री राधिका आपटे म्हणते, 'आजकाल महिलांकडून सतीसावित्री होण्याची अपेक्षा करू शकत नाहीत. एकादी तरुणी आधी रिलेशनशिपमध्ये राहते आणि प्रेग्नेंट झाल्यानंतर गर्भपात करते, ही आजच्या काळात अगदी सामान्य बाबा झाली आहे.' लग्नापुर्वीच्या सेक्सविषयी बोलताना राधिका सांगते, 'माझ्या मित्रांमध्ये एखादाच असा असेल ज्याने लग्नापूर्वी सेक्स केला नसेल.'

सलमान किंवा राधिकाच नव्हे तर अनेक बॉलिवूड कलाकार आहेत ज्यांनी यापूर्वी या बोल्ड विषयावर आपले मत व्यक्त केले आहे. चला तर मग जाणून घेऊया लग्नापुर्वी सेक्स करण्याविषयी काय मत आहे या बॉलिवूड सेलिब्रिटींचे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...