आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Stars And Their Bonding With Step Mother

सनी-बॉबीने केली नाही सावत्र आईच्या तब्येतीची चौकशी, जाणून घ्या सावत्र आईसोबतचे स्टार्सचे नाते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः सनी-बॉबी देओल आणि हेमामालिनी)
आपल्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळे नेहमी चर्चेत राहणा-या अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या तब्येतीत आता हळूहळू सुधारणा होत आहे. अलीकडेच राजस्थानमधील दौसा येथे त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात त्यांना बराच मार लागला. तर एका दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. जयपूर येथील फर्टिस रुग्णालयात उपचार झाल्यानंतर त्यांना खासगी चार्टर्ड प्लेनने मुंबईला हलवण्यात आले. हेमा
या अभिनेते धर्मेंद्र यांच्या दुस-या पत्नी आहेत. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीपासून असलेली मुले सनी आणि बॉबी देओल यांनी आपल्या सावत्र आईच्या तब्येतीची चौकशी केली नसल्याचे समजते.
खरं तर धर्मेंद्र यांनी आपल्या पहिल्या पत्नी आणि मुलांच्या विरोधाला झुगारुन हेमा यांच्यासोबत दुसरे लग्न थाटले होते. हेमा यांच्यासोबत लग्न करण्यापूर्वी धर्मेंद्र यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले होते, तर मुलगा सनी देओल सिनेसृष्टीत पदार्पणाची तयारी करत होता. सनी आपल्या वडिलांच्या या निर्णयामुळे नाखुश होता. प्रेम आणि कुटुंब यांच्यात समतोल साधत धर्मेंद्र यांनी धर्म परिवर्तन करुन हेमामालिनी यांच्यासोबत लग्न केले. त्यामुळे सनी देओल आणि बॉबी देओल यांचे सावत्र आई हेमामालिनीसोबत खूप चांगले संबंध नाहीत. शिवाय सावत्र बहिणी ईशा आणि अहाना यांच्यासोबतही त्यांनी नाते ठेवलेले नाही. सनी आणि बॉबी आपल्या दोन्ही सावत्र बहिणींच्या लग्नात सहभागी झाले नव्हते. सार्वजनिक ठिकाणीसुद्धा हे दोघे सावत्र आई आणि बहिणींविषयी बोलणे टाळत असतात.
सनी आणि बॉबीच नव्हे, तर बॉलिवूडमध्ये आणखी काही स्टार्स असे आहेत, ज्यांनी आपल्या वडिलांच्या दुस-या लग्नाचा स्वीकार केलेला नाही. तर काहींनी सहज आपल्या सावत्र आईला स्वीकारले.
एक नजर टाकुया अशाच काही नातेसंबंधांवर...