आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावत्र आईसोबत आहे शाहिदचे स्ट्राँग बाँडिंग, जाणून घ्या सावत्र आईसोबत कसे आहे या Starsचे नाते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः सुप्रिया पाठक आणि पंकज कपूर) - Divya Marathi
(फाइल फोटोः सुप्रिया पाठक आणि पंकज कपूर)
अभिनेता शाहिद कपूरच्या लग्नाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. गेल्या महिन्यात 7 जुलै रोजी दिल्ली गर्ल मीरा राजपूतसोबत शाहिद विवाहबद्ध झाला. त्याच्या लग्नात महत्त्वाची भूमिका बजावली ती त्याच्या आईंनी. शाहिदला सख्खी आणि सावत्र आई आहे. शाहिदच्या सख्या आईचे नाव नीलिमा अजीम आहे.
शाहिद अभिनेते पंकज कपूर आणि नीलिमा अजीम यांचा मुलगा आहे. मात्र नीलिमा यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर पंकज यांनी अभिनेत्री सुप्रिया पाठक यांच्यासोबत दुसरा विवाह केला. घटस्फोटानंतर शाहिद वडिलांकडेच राहिला.
शाहिदचे सुप्रिया पाठक यांच्यासोबत स्ट्राँग बाँडिंग आहे. त्याच्या लग्नातील प्रत्येक विधीत सुप्रिया त्याच्यासोबत होत्या. लग्नापासून ते रिसेप्शनपर्यंतच्या सर्व गोष्टींकडे सुप्रिया यांनी जातीने लक्ष दिले होते. शाहिदचे केवळ सुप्रिया यांच्यासोबतच नव्हे तर त्यांच्या मुलांसोबतही खूप चांगले संबंध आहेत. सना कपूर हे त्याच्या सावत्र बहिणीचे नाव आहे. ती सुप्रिया आणि पंकज कपूर यांची मुलगी आहे. विशेष म्हणजे सना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'शानदार' या सिनेमात सना आणि शाहिद आणि एकत्र काम करत आहेत. त्यांच्यासोबत आलिया भट मेन लीडमध्ये आहे.

शाहिद कपूरच नव्हे, तर बॉलिवूडमध्ये आणखी काही स्टार्स असे आहेत, ज्यांनी आपल्या वडिलांच्या दुस-या लग्नाचा सहज स्वीकार केला तर काहींनी मात्र कधीही आपल्या सावत्र आईला स्वीकारले नाही. एक नजर टाकुया अशाच काही नातेसंबंधांवर...
बातम्या आणखी आहेत...