आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार्सने सांगितले Fansचे किस्से: तरुणीने अक्षयला दिली होती आत्महत्येची धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: शाहरुख खान स्टारर 'फॅन' सिनेमा 15 एप्रिलला रिलीज होत आहे. सिनेमाची कहाणी एका सुपरस्टार आणि त्याच्या फॅनच्या नात्यावर आधारित आहे. रिअल लाइफमध्येसुध्दा अनेकदा सुपरस्टार्सना अशा चाहत्यांचा सामना करावा लागला आहे. या चाहत्यांनी त्यांना अनेकदा संकटात टाकले तर कधी इमोशनल केले. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आज अशाच काही बॉलिवूड स्टार्सचे किस्से सांगत आहोत, चला तर मग एक नजर टाकूया या किस्स्यांवर.
जेव्हा लग्नाचा हट्ट करून दिली आत्महत्येची धमकी...
अक्षय कुमारच्या सांगण्यानुसार, काही दिवसांपूर्वी त्याच्यासोबत एक विचित्र घटना घडली होती. त्याच्या सिक्युरिटी गार्डने त्याला येऊन सांगितले, की एक मुलगी तीन दिवसांपासून त्याच्या घराबाहेर बसलेली आहे आणि अक्षयला भेटण्याचा हट्ट करतेय. अक्षयने त्या मुलीला घरी बोलावले. त्याने विचार केला, की ती चाहती असेल, जेणेकरून ती भेटून, ऑटोग्राफर घेऊन निघून जाईल. परंतु ती तरुणी अक्षयला भेटताच त्याच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, 'तू माझा बॉयफ्रेंड आहेस.'
अक्षयने सांगितले, की ही तरुणी चांगल्या घरातली दिसत होती. परंतु तो तिचा वेडेपणा पाहून घाबरला होता. तिने अक्षयबरोबर लग्न करण्याचा हट्ट धरला होता. ती म्हणाली, माझ्यासोबत लग्न कर अथवी मी जीव देईल. मात्र, अक्षयने शांततेत तिला समजावले. तिच्या घरचा नंबर घेतला आणि तिच्या घरच्यांना बोलावले. तिचे कुटुंबीय आले आणि तिला घेऊन गेले. ती पंजाबच्या एका श्रीमंत घरातील तरुणी होती. अक्षयला भेटण्यासाठी ती घरातून पळून आली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, स्टार्स आणि त्यांच्या चाहत्यांचे किस्से...