आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृतिकची ही बहीण तिस-यांदा चढणारेय बोहल्यावर, भेटा सेलेब्सच्या Unknown बहीणभावंडांना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता हृतिक रोशनच्या घरी लवकरच सनई चौघड्यांचे सूर ऐकू येणार आहेत. थांबा थांबा तर्कवितर्क लावू नका. सुझान खानसोबत घटस्फोटानंतर हृतिक लग्न करत नाहीये. त्याच्या घरी लग्न आहे हे त्याच्या लाडक्या बहिणीचे. हृतिकचे बहीण सुनैना लवकरच लग्नगाठीत अडकणार असल्याचे वृत्त आहे. सुनैनाने खासगी आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. दोन घटस्फोट, कॅन्सरसारखा जीवघेणा आजाराला ती सामोरे गेली आहे. पाच वर्षांपूर्वी तिला कॅन्सर झाला होता. मात्र किमोथेरेपीनंतर ती बरी झाली आहे. आता ब-याच संघर्षानंतर तिला जोडीदार गवसला आहे.  
हृतिक आणि त्याचे वडील प्रसिद्ध अभिनेते आहेत. मात्र सुनैना नेहमीच प्रसिद्धीझोतापासून दूर असते. सुनैना एक निर्माती असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. हृतिक रोशन स्टारर \'काइट्स\' आणि \'क्रेजी 4\' या सिनेमांसाठी तिने को-प्रोड्युसर म्हणून काम केले आहे. 
 
हृतिक रोशनप्रमाणेच बी टाऊनच्या अनेक सेलिब्रिटींची बहीणभावंड प्रसिद्धीझोतापासून दूर आहेत. याच लाइमलाइटपासून दूर राहणा-या सेलिब्रिटींच्या बहीणभावंडांची ओळख आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून करुन देत आहोत...
 
भेटा पडद्यामागे राहणा-या सेलेब्सच्या बहीणभावंडांना...