आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईसाठी SRK ने शेअर केला इमोशनल मेसेज, पाहा Star Momsचे Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे) शाहरुख खान आई लतिफ फातिमा खानसोबत. (उजवीकडे) आई पिंकी रोशनसोबत हृतिक रोशन - Divya Marathi
(डावीकडे) शाहरुख खान आई लतिफ फातिमा खानसोबत. (उजवीकडे) आई पिंकी रोशनसोबत हृतिक रोशन

मुंबईः शुक्रवारी शाहरुख खान स्टारर 'फॅन' हा सिनेमा रिलीज झाला. रिलीजच्या आदल्या दिवशी शाहरुखने ट्विटर अकाउंटवर त्याची आई लतीफ फातिमा खान यांचा एक फोटो शेअर करुन इमोशनल मेसेज लिहिला. ट्विट करताना शाहरुख म्हणाला, "I loved it when my mom smiled. Her smile always hugged me. Every yr this day I talk to her & make her smile"
वडिलांच्या निधनानंतर आईने केला सांभाळ
शाहरुख १५ वर्षांचा असताना त्याचे वडील ताज मोहम्मद यांचे कॅन्सरमुळे निधन झाले होते. १९८१ मध्ये पतीच्या निधनानंतर लतीफ फातिमा यांनी पतीचा व्यवसाय सांभाळून आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ केला. त्यांनीच शाहरुखला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेण्यास प्रोत्साहन दिले. १९९० मध्ये लतीफ यांचे आजारपणामुळे निधन झाले. आपली आई आपला एकही सिनेमा बघू शकली नाही, याची खंत शाहरुखला आहे. आईच्या निधनाच्या दोन वर्षांनी शाहरुखचा दीवाना हा सिनेमा रिलीज झाला होता.

शाहरुख-लतीफ यांच्यासोबतच या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूड स्टार्सची त्यांच्या आईसोबत छायाचित्रे दाखवत आहोत... फोटो बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर....