आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखपासून शिल्पा शेट्टीपर्यंत, परदेशात आहे या बॉलिवूड सेलेब्सची कोट्यवधींची प्रॉपर्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख खान - Divya Marathi
शाहरुख खान
बॉलिवूड स्टार्सची कमाई कोट्यवधींमध्ये आहे. त्यामुळे विविध माध्यमांमध्ये हे सेलिब्रिटी गुंतवणूक करत असतात. भारतासोबतच परदेशात हे सेलिब्रिटी प्रॉपर्टीत गुंतवणूक करणे पसंत करतात. शाहरुख खानविषयी बोलायचे झाल्यास मुंबईतील 'मन्नत' या बंगल्याव्यतिरिक्त दुबई आणि लंडनमध्येसुद्धा त्याचे आलिशान बंगले  आहेत.  

14 हजार Sqft मध्ये आहे शाहरुखचा दुबईतील बंगला... 
शाहरुखकडे दुबईत स्वतःचा आलिशान व्हिला आहे. या व्हिलाचे नाव सिग्नेचर असे आहे. दुबईतील जन्नत म्हणून ओळखल्या जाणा-या पाम जुमेराह बीचवर स्थित हा आलिशान व्हिला 14000 चौरस फुट असून त्यावर साडे आठ हजार चौरस फुटाचे बांधकाम करण्यात आले आहे. या घराची किंमत जवळजवळ 18 कोटी रुपये आहे. समुद्रावर तयार करण्यात आलेले हे आर्टिफिशियल आयलँड आहे. 5 किलोमीटर लांब आणि 5 किलोमीटर रुंद असलेले पाम आयलँड एका खासगी कंपनीने तयार केले आहे. हे 800 फुटबॉल मैदानांच्या बरोबरीचे आहे. मुख्य जमीनीला जोडण्यासाठी एक 300 मीटरचा पुलसुद्धा येथे तयार करण्यात आला आहे. 
या बंगल्यात प्रत्येक छोट्या-मोठ्या सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. या व्हिलामध्ये सहा बेडरुम आहेत. शिवाय जिम, लिफ्ट आणि प्ले ग्राऊंडचीही सोय या व्हिलात आहे. शाहरुखने खास दोन रिमोट कंट्रोल्ड कार गॅरेज तयार करुन घेतले आहेत. याशिवाय येथे एक पूल आणि खासगी बीच आहे. याचा उपयोग खान कुटुंब बग्गी राइड्ससाठी करतात. शाहरुखच्या या बंगल्यात फराह खानच्या हॅपी न्यू इयर या सिनेमाचे शूटिंग करण्यात आले. सुटीच्या दिवसांत शाहरुख आपल्या कुटुंबीयांबरोबर नेहमी येथे येत असतो.

दुबईशिवाय शाहरुखने लंडनच्या सेंट्रल एरियात एक अपार्टमेंट खरेदी केले असून त्याची किंमत 195 कोटी असल्याचे सांगितले जाते.  
 
पुढील स्लाईड्सवर वाचा, बॉलिवूडच्या आणखी कोणकोणत्या स्टार्सकडे आहे परदेशात बंगले...  
 
बातम्या आणखी आहेत...