आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 9 कलाकारांचे आयुष्याचे शेवटचे क्षण गेले अज्ञातवासात, अनेकांकडे उपचारासाठीही नव्हते पैसे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री परवीन बाबी - Divya Marathi
अभिनेत्री परवीन बाबी
बॉलिवूडमध्ये अनेक असे स्टार आहेत, ज्यांनी करिअरच्या सुरुवातीला स्टारडम, प्रसिध्दी, पैसा मिळवला. परंतु अखेरच्या काळात ते अज्ञातवासात गेले. यामध्ये अभिनेत्री परवीन बाबीचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. परवीन बाबीने अनेक सुपरहिट सिनेमांत काम केले. परंतु आयुष्यातील शेवटचे दिवस तिने एकांतातच घालवले. तिचे मानसिक संतुलन बिघडले होते. परवीनशिवाय अनेक बॉलिवूड स्टार्स आहेत, जे आयुष्याच्या शेवटच्या क्षणी एकटे राहिले आणि अज्ञातवासात आयुष्य घालवले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अनेकांकडे तर शेवटच्या काळात उदर्निवाह आणि उपचारांसाठी पैसेसुद्धा नव्हते.  
 
तीन दिवसांनंतर कळली मृत्यूची बातमी...  
परवीन बाबीची गणना बॉलिवूडच्या सुपरस्टार्समध्ये होते. पण सुपरस्टार असूनदेखील शेवटच्या काळात ती एकटी होती. महेश भट, कबीर बेदी, डॅनी यांच्यासोबतचे तिचे प्रेमकिस्से बरेच गाजले होते. मात्र प्रेमात नेहमीच तिच्या पदरी अपयश पडले. 'दीवार', 'नमक हलाल', 'अमर अकबर अँथोनी' आणि 'शान'सारख्या सुपरहिट सिनेमांत काम करणा-या परवीन बाबीचा मृत्यू मुंबईमधील तिच्या अपार्टमेंटमध्ये झाला होता. 22 जानेवारी 2005ला तिचा मृतदेह अपार्टमेंटमध्ये मिळाला होता. तिच्या शेजा-यांनी पोलिसांना सूचना दिली, की ती मागील तीन दिवसांपासून वर्तमानपत्र आणि दूध घेत नाहीये. त्यानंतर पोलिसांनी याची चौकशी केली. परवीन मुंबईमध्ये दिर्घकाळ एकटी राहिली. ती डिप्रेशनची शिकार झाली होती आणि तिने स्वत: जगापासून दूर ठेवले होते. ती कुणालाच भेटत नव्हती, सिनेमांतून अचानक गायब होऊन अज्ञातवासात गेली होती.

पुढील स्लाईड्सवर वाचा, अशाच स्टार्सविषयी ज्यांनी शेवटचा काळ अज्ञातवासात घालवला... 
 
बातम्या आणखी आहेत...