आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका Tweetसाठी मिळतात लाखो रुपये, बॉलिवूड स्टार्स असा कमावतात ट्विटरवरुन पैसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्लीः सध्याच्या काळात ट्विटरवर सेलिब्रिटींना फॉलो करण्याची नवी क्रेज निर्माण झाली आहे. एखाद्या नामवंत फिल्मी स्टारने एखादे ट्विट केल्यास त्याला फॉलो करणा-यांची जणू रिघच लागते. मात्र हे बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून लाखो-कोट्यवधीची कमाई करत असल्याचे तु्म्हाला ठाऊक आहे का? चला तर मग जाणून घेऊयात ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून सेलिब्रिटी कसा कमावतात पैसा...
एका ट्विटसाठी 4 ते 5 लाख रुपये घेते सोनाक्षी सिन्हा
बॉलिवूडमध्ये शॉटगन या नावाने प्रसिद्ध असलेले शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी लेक सोनाक्षी सिन्हा सिनेमांसोबतच सोशल नेटवर्किंग साइट्सवरसुद्धा बरीच अॅक्टिव असते. सोनाक्षीविषयी असे म्हटले जाते, की ती नॉनस्टॉप ट्विट्स करते. याचे कारणदेखील खास आहे. सोनाक्षीच्या ट्विटर पेजवर इंडियन आयडॉल, STRBUCKS आणि ASUS मोबाइलविषयीचे ट्विट्स बघायला मिळतात. सोनाक्षी एका ट्विटसाठी या ब्रॅण्ड्सकडून 4 ते 5 लाख रुपये घेते. अर्थातच एका महिन्यात सोनाक्षीने या ब्रॅण्ड्ससाठी 20 जरी ट्विट्स केले, तरी तिची कमाई ही लाखोंच्या घरात होते. म्हणजेच सोनाक्षी 52 लाख फॉलोअर्सच्या माध्यमातून कोटींच्या घरात कमाई करते.
पुढील स्लाईडमध्ये वाचा, शाहिद कपूरच्या ट्विटर कमाईविषयी...