आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Stars Hit In Hindi Movies Even After Nepotism, Kangana Ranaut To Akshay Kumar

कंगनापासून अक्षयपर्यंत घराणेशाही असूनही बॉलिवूडमध्ये हिट ठरले हे 11 स्टार्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - कंगना रनोटचा चित्रपट 'सिमरन' 15 सप्टेंबरला रिलीज होत आहे. चित्रपटाचे डायरेक्टर आहेत हंसल मेहता. कंगनाचे नाव इंडस्ट्रीशी काहीही संबंध नसलेल्या स्टार्सच्या यादीत आघाडीवर आहे. बॉलिवूडमध्ये असलेल्या घराणेशाहीमध्येही स्वतःची ओळख निर्माण करण्यात तिने यश मिळवले आहे. अनेक हिट चित्रपटांतही तिने काम केले आहे. या पॅकेजमध्ये आपण अशाच काही स्टार्सबाबत जाणून घेणार आहोत. 

1. कंगना रनोट
कंगनाने 2006 मध्ये 'गँगस्टर' चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता. या चित्रपटासाठी तिला बेस्ट फिमेल डेब्यूचा पुरस्कार मिळाला होता. त्याशिवाय कंगनाने 'वो लम्हे' (2006), 'फॅशन' (2008), 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' (2010), 'तनु वेड्स मनु' (2011), 'क्रिष -3' (2013), 'क्वीन' (2014) सह अनेक हिट चित्रपट दिले आहेत. क्वीनसाठी तिला बेस्ट अॅक्ट्रेसचा नॅशनल अवॉर्डही मिळाला आहे. 
 
2. अक्षय कुमार
अक्षय कुमारलाही काहीही पार्श्वभूमी नसताना त्याने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. 'सौगंध'द्वारे डेब्यू केल्यानंतर त्याने, 'डान्सर' (1991), 'मिस्टर बाँड' (1992), 'खिलाडी' (1992), 'मोहरा' (1994), 'इक्के पे इक्का' (1994), 'सबसे बडा खिलाड़ी'(1996), 'संघर्ष' (1999), 'हेराफेरी' (2000), 'अजनबी' (2001), 'आवारा पागल दीवाना' (2002), 'ऐतराज' (2004), 'वेलकम' (2007), 'हाउसफुल' (2010), 'बेबी' (2015), 'ब्रदर्स' (2015), टॉयलेयः एक प्रेमकथा (2017) सह अनेक चित्रपटांत काम केले आहे. 
 
 
हे स्टार्सही निर्माण करत आहेत स्वतःची ओळख..  
बॉलिवूडमध्ये असे इतरही सेलिब्रिटी आहेत, जे फिल्मी बॅकग्राऊंड नसतानाही आपले स्थान निर्माण करत आहेत. यात राजकुमार राव, स्वरा भास्कर, रिचा चड्डा यांचा समावेश आहे. 
 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, घराणेशाही असूनही बॉलिवूडमध्ये ओळख मिळवणाऱ्या स्टार्सबाबत..  
 
बातम्या आणखी आहेत...