आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुल्लम खुल्ला 'किस' करेंगे हम दोनो.. जेव्हा पब्लिकली किस करताना आढळले बी टाऊनचे Stars

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता रणदीप हुडा आणि अभिनेत्री ऋचा चड्ढा लवकरच 'मैं और चार्ल्स' या आगामी सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. लवकरच रिलीज होणा-या या सिनेमाच ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. यासाठी एक मोठा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. यावेळी रणदीप सिनेमातील गेटअपमध्ये इव्हेंटस्थळी दाखल झाला. स्टेजवर एन्ट्री करताच रणदीप ऋचाकडे आला आणि तिच्यासोबच लिपलॉक केले. दोघांना इंटीमेट होतानाच क्षण लगेचच फोटोग्राफर्सनी आपल्या कॅमे-याच कैद केला.
खरं तर स्टार्स नेहमीच प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी नवनवीन फंडे वापरत असतात. रणदीप-ऋचाच नव्हे तर यापूर्वी अनेक सेलिब्रिटींनी सार्वजनिक ठिकाणी खुलेआम किस करुन चर्चा एकवटली आहे. त्यामुळे अनेक जण वादातही अडकले आहेत.
या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला रणदीप आणि ऋचापूर्वी कोणकोणत्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी खुलेआम किस केले, ते सांगत आहोत..
अमिताभ आणि जया बच्चन
गेल्यावर्षी एका अवॉर्ड समारंभात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी पत्नी जया यांना सर्वांसमोर ओठांवर किस केले होते. स्क्रिन अवॉर्डमध्ये जेव्हा अमिताभ यांना लाइफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आणि त्यांनी त्यांचा आनंद पत्नी जयासोबत असा व्यक्त केला. अवॉर्डसाठी नाव घोषित होताच अमिताभ जयाकडे आले आणि त्यांना किस केले होते. विशेष म्हणजे अमिताभ आणि जया पहिल्यांदाच पब्लिकली असे किस करताना दिसले.

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, आणखी कोणकोणते सेलिब्रिटी पब्लिकली इंटीमेट होताना दिसले...