आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रीना रॉयसोबत तुलना झाल्याने भडकली होती सोनाक्षी, बॉलिवूडमध्ये या सेलेब्सचे आहेत डुप्लिकेट्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - यावर्षीच्या सुरुवातील रिलीज झालेल्या 'फॅन' या सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी अभिनेता शाहरुख खान म्हणाला होता, की तारुण्यात त्याला हॉलिवूड अॅक्टर अल पचीनो असल्यासारखे वाटायचे. शाहरुखच्या या वक्तव्याशी त्याचे चाहते कितपत सहमत आहेत, हे तर टाऊक नाही. मात्र बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांच्या चेह-याशी साधर्म्य साधणारे कलाकार येथे आहेत. यामध्ये ऐश्वर्या राय-स्नेहा उलाल, कतरिना कैफ-जरीन खान, हृतिक रोशन-हरमन बावेजासह अनेक जणांचा समावेश आहे. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशाच सेलिब्रिटींविषयी सांगतोय, ज्यांच्या चेह-यांमध्ये कमालीचे साधर्म्य आढळते. त्यांना आपण LOOK A LIKE म्हणू शकतो.

सोनाक्षी सिन्हा-रीना रॉय
बॉलिवूडची 'दबंग' गर्ल सोनाक्षी सिन्हाची तुलना गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री रीना रॉयसोबत केली जाते. अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी लेक सोनाक्षी सिन्हा हुबेहुब रीना रॉयसारखी दिसते, असे म्हटले गेले. त्यामुळे सोनाक्षी आणि तिची आई पूनम सिन्हा खूप नाराज झाल्या होत्या. रीना रॉय यांच्याशी सोनाक्षीची तुलना होण्यामागे एक कारण म्हणजे, एकेकाळी रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यात जवळीक होती. शिवाय पूनम सिन्हा यांच्यासोबत लग्नानंतरसुद्धा शत्रुघ्न सिन्हा रीना रॉयला भेटायचे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रीना यांनी म्हटले होते, की सोनाक्षीचा चेहरा तिची आई पूनम सिन्हाशी मिळता-जुळता आहे. 'दबंग' या सिनेमात सलमान खानने सोनाक्षीला भारतीय लूक दिला होता, त्यामुळे कदाचित तिचा चेहता माझ्याशी मिळत असावा.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच काही बॉलिवूड सेलेब्सविषयी ज्यांचे आहेत डुप्लिकेट्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...