आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रीना रॉयसोबत तुलना झाल्याने भडकली होती सोनाक्षी, या सेलेब्सचेसुद्धा आहेत Duplicates

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः रीना रॉय आणि सोनाक्षी सिन्हा)
मुंबई - बॉलिवूडची दबंग गर्ल अर्थातच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने वयाची 28 वर्षे पूर्ण केली आहेत. 'दबंग' या आपल्या पहिल्याच सिनेमाच्या माध्यमातून सोनाक्षीने प्रेक्षकांच्या मनावर स्वतःची वेगळी छाप उमटवली आहे. सोनाक्षीने सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर तिची तुलना एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री रीना रॉयसोबत करण्यात आली.
अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी लेक सोनाक्षी सिन्हा हुबेहुब रीना रॉयसारखी दिसते, असे म्हटले गेले. त्यामुळे सोनाक्षी आणि तिची आई पूनम सिन्हा खूप नाराज झाल्या होत्या.
रीना रॉय यांच्याशी सोनाक्षीची तुलना होण्यामागे एक कारण म्हणजे, एकेकाळी रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यात जवळीक होती. शिवाय पूनम सिन्हा यांच्यासोबत लग्नानंतरसुद्धा शत्रुघ्न सिन्हा रीना रॉयला भेटायचे.
सोनाक्षीचा चेहरा रीना रॉय यांच्याशी मिळताजुळता असल्याचे अडचणी निर्माण झाल्या होत्या. इतकेच नाही तर पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानपासून विभक्त झाल्यानंतर मुलगी सनमसोबत राहणा-या रीना रॉय यांच्या कानापर्यंत ही बातमी पोहोचली तेव्हा त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन या सर्व वृत्तांचे खंडन केले.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रीना यांनी म्हटले होते, की सोनाक्षीचा चेहरा तिची आई पूनम सिन्हाशी मिळता-जुळता आहे. 'दबंग' या सिनेमात सलमान खानने सोनाक्षीला भारतीय लूक दिला होता, त्यामुळे कदाचित तिचा चेहता माझ्याशी मिळत असावा.
तसे पाहता बॉलिवूडमध्ये दुस-या व्यक्तीशी साधर्म्य साधणारी सोनाक्षी एकमेव अभिनेत्री नाहीये. सोनाक्षीसह अनेक सेलेब्स आपल्यासारख्या दिसणा-या दुस-या व्यक्तीमुळे चर्चेत आले आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या आणखी कोणकोणत्या सेलिब्रिटींच्या आहेत डबल रोल...