2017 हे अर्धे वर्ष सरले आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे यावर्षी मोठ्या पडद्यावरुन गायब आहेत. खरं तर या सर्व स्टार्सनी यापूर्वी अनेक सुपरहिट सिनेमांत काम केले आहे. करीना कपूरपासून ते बिपाशा बसू, अभय देओल, अभिषेक बच्चन या मोठ्या स्टार्सचे एकही सिनेमे यावर्षी मोठ्या पडद्यावर झळकले नाहीत.
यावर्षी ऐश्वर्या राय बच्चनचा एकही सिनेमा नाही...
'जज्बा' (2015) या सिनेमातून कमबॅक केल्यानंतल ऐश्वर्या राय यावर्षी एकाही सिनेमात झळकली नाही. 2016 मध्ये रिलीज झालेल्या 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमात ती शेवटची झळकली होती. ऐश्वर्याने तिच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे केले. यामध्ये तिच्या 'हमारा दिल आपके पास है' (2000), 'मोहब्बतें' (2000), 'देवदास' (2002), 'दिल का रिश्ता' (2003), 'खाकी' (2004), 'धूम 2' (2006) सह अनेक गाजलेल्या सिनेमांचा उल्लेख होतो.
अभिषेक बच्चन
2017 मध्ये अभिषेक बच्चन एकाही सिनेमात दिसला नाही. 'हाउसफुल 3' (2016) हा त्याचा शेवटचा सिनेमा होता. अभिषेकने 'बंटी और बबली' (2005), 'दस' (2005), 'गुरु' (2007), 'दोस्ताना' (2008), 'हॅप्पी न्यू ईयर' (2014) सह अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केले आहे.
पुढील स्लाईड्सवर वाचा, यावर्षी मोठ्या पडद्यावरुन गायब असलेल्या आणखी काही स्टार्सविषयी...