आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्योतिषाने \'दिलीप\'ला बनवले \'रहमान\', जाणून घ्या कुणाच्या सांगण्यावरून बदलली स्टार्सची नाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ए. आर. रहमान यांना विशेष ओळखीची गरज नाहीये. 6 जानेवारी 1967ला चेन्नईमध्ये जन्मेलेल्या 49 वर्षीय रहमान यांचे बालपणापासूनच संगीताशी नाते जुळलेले आहेत. त्यांचे वडील आर. के. शेखर फिल्म-स्कोर कम्पोजर होते. रहमान 9 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांच्या निधन झाले आणि आईचे घराची जबाबदारी उचलली. रहमान यांचे खरे नाव ए.एस. दिलीप कुमार आहे.
ज्योतिषाच्या सांगण्यावरून बदलले नाव...
रहमान यांच्या 'द स्पिरिट ऑफ म्यूझिक' या बॉयोग्राफीमध्ये सांगण्यात आले आहे, की एका ज्योतिषाच्या सांगण्यावरून त्यांनी आपले खरे नाव बदलले. रहमान यांच्या आयुष्यावरील या पुस्तकात लिहिले आहे, की प्रसिध्द लेखिका नसरीन मुन्नी कबीर यांनी जेव्हा त्यांना विचारले, की ते दिलीपपासून रहमान कसे झाले? यावर रहमान यांवी सांगितले, 'खरं सांगायचे झाले तर मला माझे नाव आवडत नव्हते. हे नाव माझ्या प्रतिमेल शोभत नव्हते. सूफी पथाशी जुळण्यापूर्वी आई एका ज्योतिषाकडे धाकट्या बहिणीची कुडली (लग्नासंदर्भात) घेऊन गेली. याच काळात मला नाव बदलून नवीन ओळख निर्माण करण्याची उत्सूकता होती. तेव्हा त्या ज्योतिषाने मला पाहिले आणि सल्ला दिला, की 'अब्दुल रहमान' आणि 'अब्दुल रहीम' या दोन्ही नावांपैकी एक नाव तुझ्यासाठी चांगले राहिल. मला रहमान नाव आवडले. विशेष म्हणजे, एका हिंदु ज्योतिषाने मला मुस्लिम नाव दिले. नंतर आईने रहमानच्या आधी अल्ला रख्खा लावण्यास सांगितले. अशाप्रकारे माझे नाव ए आर रहमान पडले.'
रहमनशिवाय अनेक बॉलिवूड स्टार्स आहेत, ज्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून स्वत:चे नाव बदलून रुपेरी पडद्यावर झळकले आहेत. अनेकांना तर यांची खरी नावेसुध्दा माहित नाहीये.
अशाच काही स्टार्सविषयी वाचण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...