आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी आहे सलमान-सुष्मिता, जॉन-धोनीसह या बॉलिवूड सेलेब्सची फ्रेंडशिप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्क: ऑगस्टचा पहिला रविवार म्हणजे जगभरात 'फ्रेंडशिप डे'ची धूम असते. या दिवशी सामान्य लोकांसोबतच बॉलिवूड कलाकारसुध्दा आपल्या मैत्रीच्या आठवणी ताजे करतात. आज फ्रेंडशिप डे जगभरात साजरा केला जातोय. त्यानिमित्त आम्ही तुम्हाला आज बॉलिवूड सेलेब्सच्या निखळ मैत्रीविषयी सांगत आहोत. बॉलिवूड कलाकारांनी आपल्या फ्रेंड्सविषयी दिलखुलासपणे मत व्यक्त केले आहे. त्यामध्ये प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, सुष्मिता सेन, अभिषेक बच्चन, नाना पाटेकर आणि सिद्धार्थ मल्होत्रासह अनेक सेलेब्स सामील आहेत.
मैत्रीचे खास उदाहरण आहे सलमान खान- सुष्मिता सेन
'मैत्रीविषयी जेव्हा बोलले जाते, तेव्हा कृष्णा-सुदाम'ची आठवण येते. एकदा सुदामाने कृष्णाला विचारले, की मैत्रीचा अर्थ काय? यावर कृष्णा म्हणाला, 'जेथे मैत्रीचा अर्थ असेल तिथे मैत्री नसते.' आजच्या कमर्शिअल जगात मैत्री करायची असेल तर त्याचा अर्थ सिध्द झाला पाहिजे. मात्र या जगात मला एक अशी व्यक्ती भेटली जी मैत्रीची खास उदाहरण आहे. ती व्यक्ती म्हणजे सलमान खान. सलमान स्वार्थासाठी मैत्री करत नाही. तो वेळोवेळो साथ देतो. त्यामुळे सलमान अनेक वर्षांपासून माझा मित्र आहे. मला जेव्हा कधी एखाद्या गोष्टीत सल्ल्याची आवश्यकता असते, तेव्हा मी त्याच्याकडे जाते. मला आठवते, की एकदा माझी मुलगी रिनीचे तब्येत रात्री 12 वाजता खराब झाली होती. मला काहीच समजत नव्हते, कोणत्या डॉक्टरला इतक्या रात्री फोन करू. तेव्हा अचानक सलमानचा फोन आला. त्याच्या इथे पार्टी चालू होती आणि त्याने मला बोलावले होते. मी त्याला रिनीच्या तब्येतीविषयी सांगितले त्याने जराही उशीर न करता माझ्या घरी आला. पूर्ण रात्र तो रिनीजवळ थांबला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर कलाकार कोणाला मानतात आपला बेस्ट फ्रेंड...
बातम्या आणखी आहेत...