आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैफपासून ते अनिल कपूरपर्यंत, या अभिनेत्‍यांनी केला आपल्‍या मेहुणी आणि वहिणींसोबत रोमान्‍स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी त्यांच्या ख-या आयुष्यातील वहिनी आणि मेव्हणीसोबत रोमान्स केला आहे. पण, तो प्रत्‍यक्षात नाही तर पडद्यावर. त्‍यातील काहींवर हॉट सीन्‍सही चित्रित झाले. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला याच अभिनेत्यांविषयी सांगतोय. 
सैफ अली खानने केला करिश्मा कपूरसोबत स्क्रिनवर रोमान्स...  

सैफ अली खान आणि करिश्मा कपूर
'हम साथ-साथ हैं' (1999) या सिनेमात अभिनेता सैफ अली खान आणि करिश्मा कपूर ही जोडी होती. हे दोघेही पडद्यावर रोमान्स करताना दिसले होते. करिश्मा ख-या आयुष्यात सैफ अली खानची मेहुणी आहे. सैफची पत्नी करीना कपूर खान करिश्माची धाकटी बहीण आहे. या सिनेमाच्या रिलीजच्या 13 वर्षांनी सैफ आणि करीना यांनी लग्न (2012) केले होते. 
 
अनिल कपूर आणि श्रीदेवी
श्रीदेवी नात्याने अनिल कपूरची वहिनी आहे. श्रीदेवी अनिलचा थोरला भाऊ बोनी कपूरची पत्नी आहे. अनिल कपूरने आपल्या वहिनीसोबत सिल्व्हर स्क्रिनवर अनेकदा रोमान्स केला आहे. 'मि. इंडिया' (1987), 'लम्हे' (1991), 'रूप की रानी चोरों का राजा' (1993), 'लाडला' (1994), 'जुदाई' (1997) सह अनेक सिनेमांमध्ये श्रीदेवी आणि अनिल कपूर एकत्र झळकले. 'जुदाई' हा सिनेमा श्रीदेवी आणि बोनी यांच्या लग्नानंतर रिलीज झाला होता. 1996 साली दोघांचे लग्न झाले होते. अनिल कपूरसोबत इतर सिनेमे श्रीदेवीने लग्नापूर्वी केले होते.

पुढील स्लाईड्सवर वाचा, आणखी कोणकोणते अभिनेते पडद्यावर मेहुणी आणि वहिनीसोबत रोमान्स करताना दिसले...  
बातम्या आणखी आहेत...