Home | Gossip | Bollywood Stars Who Are Remembered As One Film

एकाच सिनेमाने हे Celebs आले प्रकाशझोतात, मात्र आता जगताय अज्ञातवासात

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 19, 2016, 10:57 AM IST

दाक्षिणात्य अभिनेत्री सौंदर्याचा जन्म 18 जुलै 1976 रोजी कर्नाटकमध्ये झाला होता. मात्र सौंदर्या आज आपल्यात नाहीये. 17 एप्रिल 2004 रोजी बंगळुरुजवळ एका विमान अपघातात सौंदर्याचे निधन झाले.

 • Bollywood Stars Who Are Remembered As One Film
  (फाइल फोटो: सौंदर्या, अनु अग्रवाल,विवेक मुश्रान, विवेक मुश्रान)
  दाक्षिणात्य अभिनेत्री सौंदर्याचा जन्म 18 जुलै 1976 रोजी कर्नाटकमध्ये झाला होता. मात्र सौंदर्या आज आपल्यात नाहीये. 17 एप्रिल 2004 रोजी बंगळुरुजवळ एका विमान अपघातात सौंदर्याचे निधन झाले. सौंदर्याने 1992मध्ये 'गंधरवा' सिनेमातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. तिने कन्नडी, तेलगु, तामिळ आणि मल्याळम सिनेमांमध्येदेखील काम केले होते. ती 90च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री होती. तिने 100पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केले होते.
  अभिनयासोबतच तिने प्रॉडक्शनमध्येसुध्दा नशीब आजमावले. सौंदर्याला 6 दक्षिण फिल्मफेअर पुरस्कारने गौरवण्यात आले होते. तिने केवळ 'सूर्यवंशम' या एकाच हिंदी सिनेमात काम केले. या सिनेमामध्ये सौंदर्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकली होती.
  असे नव्हे, की सौंदर्या एकमेव अशी अभिनेत्री आहे, जिची ओळख केवळ एका बॉलिवूड सिनेमाने केली जाते. सौंदर्यापूर्वी आणि नंतरही अनेक अभिनेत्री आणि अभिनेते झालेत ज्यांना एका सुपरहिट सिनेमात काम करून प्रसिध्दी मिळाली. मात्र त्यानंतर त्यांचे नाव बॉलिवूडमधून हळू-हळू गायब झाले. यामध्ये भूमिका चावला, भाग्यश्री, कुमार गौरव, राजीव कपूर, राहूल रॉय, अनु अग्रवाल, जिया खान, ग्रेसी सिंहसह अनेक स्टार्सचे नाव घेतले जाते.
  बॉलिवूडमध्ये केवळ एका सिनेमांसाठी ओळखल्या जाणा-या स्टार्सविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
  (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • Bollywood Stars Who Are Remembered As One Film
  भाग्यश्री-
   
  निरागस चेह-याची भाग्यश्री आज लाइमलाइपासून कोसो दूर आहे. अलीकडेच भाग्यश्रीने 'लौट आओ त्रिशा' मलिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मात्र तिला यात हवी तशी लोकप्रिय मिळाली नाही. भाग्यश्रीने 1989मध्ये आलेल्या सलमान खान स्टारर 'मैन प्यार किया' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि तिला भरभरुन लोकप्रिय मिळाली होती. मात्र लग्ना करून भाग्यश्रीने सिनेसृष्टीला रामराम ठोकला.
 • Bollywood Stars Who Are Remembered As One Film
  कुमार गौरव-
   
  गतकाळातील अभिनेते राजेंद्र कुमार यांचा मुलगा कुमार गौरव 1981मध्ये आलेल्या 'लव्ह स्टोरी' सिनेमाने चर्चेत आला होता. मात्र त्यानंतर कुमारच्या वाट्याला केवळ अपयश येत गेले आणि तो लवकरच सिनेसृष्टीपासून वेगळा झाला. कुमार केवळ 'लव्ह स्टोरी' सिनेमासाठी ओळखले जाते.
 • Bollywood Stars Who Are Remembered As One Film
  राजीव कपूर-
   
  शोमॅन, अभिनेते आणि निर्माते राज कपूर यांनी मुलगा राजीव कपूरला 'राम तेरी गंगा मैली' सिनेमातून 1985मध्ये लाँच केले होते. या रोमँटिक सिनेमातून राजीव यांना बरीच लोकप्रियता मिळाली, मात्र या यशानंतर पुढील करिअर टिकवण्यात ते अपयशी ठरले. अनेक फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर राजीव यांनी सिनेसृष्टीशी दूरावा वाढवला. राजीव यांना केवळ 'राम तेरी गंगा मैली' सिनेमासाठीच ओळखले जाते.
 • Bollywood Stars Who Are Remembered As One Film
  राहूल रॉय-
   
  राहूल रॉय महेश भट्ट दिग्दर्शित 'आशिकी' सिनेमातून इंडस्ट्रीमध्ये आला. या रोमँटिक सिनेमाने त्याला चांगलीच प्रसिध्दी मिळवून दिली. या सिनेमातून राहूलला रोमँटिक हीरो म्हणून ओळख मिळाली. परंतु ही ओळख पुढे कायम ठेवण्यात तो अपयशी ठरला. या सुपर-डुपर हिट सिनेमानंतर त्याने काही फ्लॉप सिनेमे दिले आणि त्याने सिनेसृष्टीतून काढता पाय घेतला.
 • Bollywood Stars Who Are Remembered As One Film
  नु अग्रवाल-
   
  राहूल रॉयसोबत 'आशिकी' सिनेमात काम करणारी अनु अग्रवालसुध्दा या सिनेमातून लोकप्रिय झाली. तिने या सिनेमातून लाखो तरुणांची मने जिंकली. मात्र एका अपघाताने अनुचे आयुष्यच पालटले. अनुची काही वर्षे रुग्णालयातच गेली आणि तिचे करिअर संपुष्टात आले. अनुला आजही 'आशिकी' सिनेमासाठी ओळखले जाते.
 • Bollywood Stars Who Are Remembered As One Film
  जुगल हंसराज
   
  क्यूट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता जुगल हंसराजने 1994मध्ये आलेल्या 'आ गले लग जा' सिनेमातून खूप लोकप्रिता मिळवली होती. त्यावेळी सिनेमाची बरीच प्रशंसा झाली, मात्र आपली लोकप्रियता पुढे कायम टिकवण्यात जुगलला अपयश आले. या सिनेमात जुगलसोबत उर्मिला मार्तोंडकर झळकली होती.
 • Bollywood Stars Who Are Remembered As One Film
  विवेक मुश्रान
   
  विवेक मुश्रानने 1991मध्ये आलेल्या 'सौदागर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सिनेमा सुपरहिट ठरला मात्र विवेकचे पुढील करिअर फ्लॉप ठरले. विवेकला या सिनेमातून नवी ओळख मिळाली होती. सिनेमात त्याच्यासोबत मनीषा कोइरालानेसुध्दा काम केले होते. 
 • Bollywood Stars Who Are Remembered As One Film
  डायना पेंटी
   
  2012मध्ये आलेल्या दीपिका पदुकोण आणि सैफ अली खान स्टारर 'कॉकटेल' सिनेमातून डायना पेंटीला ओळख मिळाली. तिचा हा पहिलाच सिनेमा होता. सिनेमाप्रमाणेच डायनाचीदेखील बरीच चर्चा रंगली होती. मात्र या सिनेमानंतर ती बॉलिवूडमधून गायबच झाली आहे. 'कॉकटेल'नंतर डायनाने एकही सिनेमा केला नाही.
 • Bollywood Stars Who Are Remembered As One Film
  उदय चोप्रा-
   
  2000मध्ये आलेला आणि बॉक्स ऑफिसवर धूम घालणा-या 'मोहब्बते' या रोमँटिक सिनेमातून उदय चोप्राने आपल्या करिअरी सुरुवात केली. या सिनेमातून त्याला प्रेक्षकांनी नोटीसही केले, मात्र त्यानंतर उदयने अनेक फ्लॉप सिनेमे आणि त्याची ओळख पुन्हा मिटली. उद्यने 'धूम'च्या फ्रेचाइजमध्ये काम केले, मात्र त्याला हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही. उद्यला केवळ मोहब्बते सिनेमासाठी लक्षात ठेवल्या गेले.
 • Bollywood Stars Who Are Remembered As One Film
  हरमन बावेजा- 

  हरी बावेजा यांनी 2008मध्ये 'लव्ह स्टोरी 2050' सिनेमातून मुलगा हरमन वाबेजाला लाँच केले. सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला. मात्र हरमनचा चेहरा प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. हृतिर रोशनचा हमशक्ल म्हणून हरमनकडे पाहिल्या गेले. मात्र हरमन बॉलिवूडमध्ये यशस्वी होऊ शकला नाही. सध्या तो लाइमलाइटपासून दूर आहे.
 • Bollywood Stars Who Are Remembered As One Film
  ग्रेसी सिंह 

  ग्रेसी सिंहला पहिल्याच 'लगान' या सिनेमात सुपरस्टार आमिर खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. मात्र या सिनेमानंतर ग्रेसीने केवळ 'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमा केला. परंतु ग्रेसीला लगानसाठीच ओळखले जाते. या दोन सिनेमांनतर ग्रेसी लाइमलाइटपासून दूर झाली आहे.
 • Bollywood Stars Who Are Remembered As One Film
  चांदनी-
   
  1991मध्ये आलेल्या सलमान खान स्टारर 'सनम बेवफा'मध्ये झळकलेल्या चांदनीला या सिनेमातून मोठी लोकप्रियता मिळाली होती. मात्र ही लोकप्रियता ती पुढे टिकवण्यात अपयशी ठरली.
 • Bollywood Stars Who Are Remembered As One Film
  स्नेहा उल्लाल
   
  सलमान खानने लाँच केलेली आणि ऐश्वर्याची हमशक्ल अभिनेत्री स्नेहा उल्लालने 'लकी: नो टाइम फॉर लव्ह' सिनेमातून पदार्पण केले होते. मात्र या सिनेमानंतर ती अचानर गायब झाली. स्नेहा क्वचितच कॅमे-यासमोर येते.
   
 • Bollywood Stars Who Are Remembered As One Film
  गायत्री जोशी
   
  2004मध्ये रिलीज झालेल्या शाहरुख खान स्टारर 'स्वदेश' या सिनेमात गायत्री मोठ्या पडद्यावर झळकली. मात्र आता तिचा आजवरचा पहिला आणि शेवटचा सिनेमा ठरला. गायत्री मात्र केवळ एकाच सिनेमात आपली छाप सोडू शकली. 
 • Bollywood Stars Who Are Remembered As One Film
  भूमिका चावला-
   
  भूमिका चावलाने सलमान खान स्टारर ब्लॉकब्लस्टर 'तेरे नाम' सिनेमात काम केले. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर वेगळे स्थान मिळवले होते. या सिनेमानंतर भूमिकाच्या लोकप्रियतेत मोठी भर पडली. परंतु 'तेरे नाम'नंतर भूमिका जणूकाही इंसट्रीतून गायबच झाली. भूमिकाची आजही 'तेरे नाम' सिनेमातून आठवण होते.
   
   
 • Bollywood Stars Who Are Remembered As One Film
  झरीन खान
   
  कतरिना कैफची हमशक्ल म्हणून ओळखली जाणारी झरीन खान सलमान खान अभिनीत 'वीर' सिनेमात पहिल्यांदा झळकली. तिचा चेहरा प्रेक्षकांसमोर आला, मात्र जरीन आता फिल्म इंडस्ट्रीपासून चार हात लांब आहे. तिचा हा शेवटचा सिनेमा होता. सलमानने झरीनला बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. झरीन केवळ 'वीर' सिनेमासाठी ओळखली जाते. 
   
   

Trending