आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IVF, Surrogacy: Bollywood Stars Who Didn't Shy Away From Opting For These Ways!

SRK सह या बॉलिवूड सेलेब्सच्या मुलांचा झालाय IVF सरोगसीच्या माध्यमातून जन्म, जाणून घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या तिळ्या मुलांसोबत फराह खान, अबरामसोबत शाहरुख खान - Divya Marathi
आपल्या तिळ्या मुलांसोबत फराह खान, अबरामसोबत शाहरुख खान
वेगवेगळ्या कारणांमुळे मूल होऊ न शकणारे आणि मूल हवंच ही इच्छा असलेले दाम्पत्य सरोगसी मार्गाचा अवलंब करताना दिसत आहेत. सर्वसामान्यच नव्हे तर बॉलिवूडच्या काही नावाजलेल्या सेलिब्रिटींनीदेखील या मार्गाचा अवलंब केला आहे. अनेकांनी बाळ हवंय म्हणून IVF (In Vitro Fertilisation) पद्धतीने बाळाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे या सेलिब्रिटींनी कधाही ही गोष्ट जगापासून लपवून ठेवलेली नाही. अनेकदा सार्वजनिकरित्या त्यांनी याची कबुली दिली आहे.
सरोगसी म्हणजे काय?
जन्मजात गर्भाशय नसणे, गर्भधारणा होण्यात अडचणी, वारंवार गर्भपात होणे, एखाद्या आजारामुळे प्रसूतीच्या वेळी स्त्रीच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता अशा सगळ्या परिस्थितीत डॉक्टर सरोगसीचा पर्याय सुचवू शकतात. सरोगसीचे 'ट्रेडिशनल' आणि 'गेस्टॅशनल' असे दोन प्रकार आहेत.
पहिल्या प्रकारात जोडप्यातील स्त्रीच्या स्वत:च्या बीजांडाचे जोडप्यातील पुरुषाच्या शुक्राणूंशी मीलन घडवून आणून ते त्याच महिलेच्या गर्भाशयात सोडले जाते.
गेस्टॅशनल सरोगसी या प्रकारात एखाद्या जोडप्यापैकी स्त्रीचे बीजांडे आणि शुक्राणूंचे प्रयोगशाळेत मीलन घडवून आणले जाते आणि तो गर्भ दुसऱ्या महिलेच्या गर्भाशयात ठेवला जातो. नऊ महिने ती महिला त्या गर्भाचा सांभाळ करते, मुलाला जन्म देते आणि मग ते बाळ संबंधित जोडप्याकडे सोपवले जाते.
अभिनेता आमिर खान आणि शाहरुख खानने गेस्टॅशनल सरोगसीच्या माध्यमातून आपल्या बाळाला जन्माला घातले आहे. आमिर आणि शाहरुखप्रमाणे काही सेलिब्रिटींनी सरोगसीचा अवलंब करुन आपल्या बाळाला जन्म दिला आहे.
चला तर मग जाणून घेऊयात, आमिर आणि शाहरुखप्रमाणे बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रिटींनी या पद्धतीचा अवलंब करुन आईवडील होण्याचे सुख मिळवले आहे...