(अभिनेत्री मौसमी चॅटर्जी)
बी टाऊनमध्ये पदार्पण करताना येथील अनेक कलाकारांनी
आपल्या ख-या नावाला तिलांजली दिली आहे. मोठ्या पडद्यावर नशीब आजमावताना या कलाकारांनी स्वतःला दुस-या नावाने बी टाऊनमध्ये प्रस्थापित केले. येथे असे अनेक अभिनेता-अभिनेत्री आहेत, ज्यांनी नवीन नावाने आपल्या करिअरला सुरुवात केली. विशेष म्हणजे हे सर्व बॉलिवूडचे यशोशिखरावर पोहोचलेले कलाकार आहेत, ज्यांनी आपले खरे नाव बदलून नवीन नाव वापरायला सुरुवात केली.
असेच एक नाव म्हणजे मौसमी चॅटर्जी. वयाच्या 14 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण करणा-या मौसमी यांचे खरे नाव इंदिरा असे आहे. मात्र इंदिरा या नावापेक्षा मौसमी या नावाने त्यांना यश मिळेल असे प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक तरुण मजूमदार यांच्या मत होते. त्यामुळे इंदिरा यांनी मौसमी या नावाने सिनेसृष्टीत पदार्पण केले.
मौसमी यांच्याप्रमाणेच बी टाऊनमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपले नाव बदलून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हे कलाकार कोण आहेत, त्यांची खरी नावे कोणती, हे जाणून घेण्याची तुम्हाला नक्कीच उत्सुकता असणार ना...
चला तर मग हे कलाकार कोणकोण आहेत आणि त्यांची खरी नावे काय आहेत यावर एक नजर टाकुया...