आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवी, शिल्पासह या 10 अॅक्ट्रेसेसनी मोडला दुस-यांचा संसार, बसला \'होमब्रेकर\'चा ठपला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी इतरांचा संसार मोडून स्वतःचा संसार थाटला. मग ती बोनी कपूर यांच्यासोबत विवाह थाटणारी श्रीदेवी असो, किंवा आता राज कुंद्राची पत्नी असलेली शिल्पा शेट्टी. असे म्हटले जाते, की श्रीदेवीमुळे एका नव्हे तर दोन सेलिब्रिटींचा संसार उद्धवस्त होण्याची वेळ आली होती. पहिल्यांदा प्रकरण हाताबाहेर गेले नाही. मात्र दुस-यांदा एकाचा संसार उद्धवस्त झालाच. एकेकाळी श्रीदेवी आणि मिथून चक्रवर्ती यांच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. त्यावेळी मिथून यांचे योगिता बालीसह लग्न झाले होते. मात्र विवाहित मिथून श्रीदेवीच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. योगिता यांनी अनेकदा आपल्या पतीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीही परिणाम होत नसल्याचे बघून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. योगिता बाली बचावल्या गेल्या. या घटनेनंतर श्रीदेवीने मिथून चक्रवर्तींच्या आयुष्यातून काढता पाय घेतला आणि योगिता बाली यांचा संसार टिकला.

बोनी कपूर यांनी दिला होता पहिल्या पत्नीला घटस्फोट... 
श्रीदेवीचे दुसरे अफेअर बॉलिवूड निर्माता बोनी कपूरसह होते. या नात्याची सुरुवात खरं तर बोनी कपूर यांच्यातर्फे झाली होती. त्यावेळी बोनी कपूर विवाहित आणि दोन मुलांचे वडील होते. ते श्रीदेवीच्या प्रेमात इतके आकंठ बुडाले होते की त्यांनी त्यांची पहिली पत्नी मोना कपूरला घटस्फोट दिला. असे म्हटले जाते, की बोनी कपूर यांच्याशी विवाहबद्ध होण्यापूर्वीच श्रीदेवी प्रेग्नेंट होती. त्याचकारणामुळे दोघांनी घाईगडबडीत लग्न उरकून टाकले. आता बोनी आणि श्रीदेवी यांना दोन मुली आहेत.

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना 'होम ब्रेकर' मानले गेले आहेत. यामध्ये श्रीदेवीशिवाय प्रियांका चोप्रा, कंगना रनोट, लारा दत्ता, शबाना आझमी, सुष्मिता सेन, रेखा यांसारख्या ब-याच अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे. 

पुढे वाचा, जेव्हा शिल्पा शेट्टीमुळे राज कुंद्रांनी दिला होता पत्नीला घटस्फोट...  
बातम्या आणखी आहेत...