आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडचे 16 सेलेब्स, कुणी अद्याप लग्न केले नाही, तर कुणाला स्वतःचे नाहीये मुलबाळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी अद्याप लग्न केलेले नाहीये. येथे अनेक सेलिब्रिटींचे अद्याप दोनाचे चार हात व्हायचे राहिले आहेत. इतकेच नाही तर काही बॉलिवूड सेलिब्रिटी असेही आहेत ज्यांनी लग्न तर केले मात्र त्यांना स्वतःचे मुलबाळ नाही. या पॅकेजच्या माध्यमातून divyamarathi.com तुम्हाला बॉलिवूडमधील अशा काही सेलिब्रिटींविषयी सांगत आहे, ज्यापैकी काहींचे अद्याप लग्नच झालेले नाही आणि लग्न झाले, तर त्यांना मुलबाळ नाही.

साक्षी तन्वर 
जन्मतारीख - 12 जानेवारी 1973
स्टेटस - अविवाहित 

44 वर्षीय अभिनेत्री साक्षी तन्वर अद्याप सिंगल आहे. तिच्या लिंकअप्स आणि लग्नाच्या बातम्या आल्या, मात्र त्या अफवा निघाल्या. साक्षीने आपल्या करिअरची सुरुवात दुरदर्शन वाहिनीवरील 'अलबेला सूर मेला' या सांगितिक शो मधून केली होती. यासाठी तिने ऑडीशन दिली होती. काही दिवसांपूर्वीच साक्षी आमिर खान स्टारर 'दंगल' या सिनेमात झळकली होती. 
 
दिलीप कुमार आणि सायरा बानो
लग्न- 11 ऑक्टोबर 1966
स्टेटस - स्वतःचे मुलबाळ नाही 

बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार आणि सायरा बानो यांना स्वतःचे मुल नाही. दोघांच्या लग्ना 50 वर्षे झाली आहेत. सायरा आणि दिलीप साहेब आईबाबा का होऊ शकले नाही, हे फार कमी जणांना ठाऊक आहे. याविषयीचा उल्लेख दिलीप साहेबांची ऑटोबायोग्राफी द सबस्टांस अँड द शॅडोमध्ये करण्यात आला आहे. या पुस्तकात दिलीप साहेबांनी सांगितले, "सत्य हे आहे, की 1972मध्ये सायरा पहिल्यांदा गर्भवती राहिल्या होत्या. तो मुलगा होता (नंतर आम्हाला समजले.) आठ महिन्यांच्या प्रेग्नेंसीत सायरा यांना ब्लड प्रेशरचा त्रास झाला. त्यामुळे पुर्णपणे विकसित झालेल्या गर्भाला वाचवण्यासाठी सर्जरी करणे शक्य नव्हते आणि त्यातच श्वास गुदमरल्यामुळे बाळाचा मृत्यू झाला." दिलीप साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, या घटनेनंतर सायरा पुन्हा कधीच गर्भवती राहू शकल्या नाही.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या अद्याप अविवाहित असलेल्या आणि ज्यांना मुलबाळ नाही अशा काही सेलिब्रिटींविषयी...
 
बातम्या आणखी आहेत...