आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Stars Who Had No Godfather In Industry

PHOTOS : बॉलिवूडमध्ये कुणाचाही वरदहस्त नसताना राधिका आपटेसह चमकले हे 9 STARS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः अभिनेत्री राधिका आपटे) - Divya Marathi
(फाइल फोटोः अभिनेत्री राधिका आपटे)

मुंबई- बॉलिवूडमध्ये रणबीर कपूर, करीना कपूर, श्रद्धा कपूर, शाहिद कपूर, अभिषेक बच्चनसह असे अनेक तरुण स्टार्स जे फिल्मी घराण्यातून आले आहेत. बच्चन आणि कपूर या बड्या घराण्यांसोबतच रोशन, खान आणि चोप्रा कुटुंबाचा बॉलिवूडमध्ये दबदबा आहे. त्यामुळे स्वबळावर फिल्मी दुनियेत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणे हे नवोदितांसाठी तसे खूप कठीण आहे. मात्र बी टाऊनमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, जे स्वबळावर येथे टिकून आहेत. कुणाचाही वरदहस्त किंवा गॉडफादर नसताना काही तरुणी-तरुणींनी ग्लॅमर दुनियेत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलिवूड स्टार्सविषयी सांगत आहोत...
राधिका आपटे
बालपणापासूनच रंगभूमीवर अॅक्टिव राहिलेल्या राधिकाने हिंदी, मराठी, तामिळ, बंगाली आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम केले आहे. 'हंटर' आणि 'बदलापूर' या सिनेमांमध्ये ती झळकली आहे. अलीकडेच रिलीज झालेल्या सुजॉय घोष यांच्या 'अहल्या' या शॉर्ट फिल्ममध्ये राधिका झळकली आहे. लवकरच तिची प्रमुख भूमिका असलेला 'मांझीः द माउंटन मॅन' हा सिनेमा रिलीज होणार आहे. 21 ऑगस्टला रिलीज होणा-या या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी तिच्यासोबत मेन लीडमध्ये आहे. (VIDEO : राधिका आपटेचा पुन्हा एकदा बोल्ड अंदाज, अंगावर शहारा आणते 'अहल्या')
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, आणखी अशा काही स्टार्सविषयी ज्यांनी स्वबळावर येथे नाव कमावले आहे...