आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी सर्जरीने-कुणी नैसर्गिकरित्या, वाढत्या वयात आणखीच तरुण होते गेले हे बॉलिवूड स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः काळानुरुप व्यक्तीच्या लूकमध्ये बदल होतो जातो. वाढत्या वयाचा परिणामसुद्धा चेह-यावर दिसू लागतो. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही बॉलिवूड सेलिब्रिटींविषयी सांगतोय, जे वाढत्या वयात म्हातारे नव्हे तर चक्क तरुण दिसतात. होय, बॉलिवूडमध्ये असे काही स्टार्स आहेत, ज्यांचे सौंदर्य वाढत्या वयात कमी नव्हे तर आणखीनच बहरत चालेले आहे. यामध्ये अनिल कपूर, सलमान खान, माधुरी दीक्षित, अक्षय कुमार, करिश्मा कपूर, रेखा, सुश्मिता सेन या सेलिब्रिटींच्या नावाचा समावेश आहे.

काही सर्जरी करुन तर काही नैसर्गिकरित्या आहेत सुंदर...
या बॉलिवूड स्टार्सपैकी काहींनी आपले सौंदर्य कायम ठेवण्यासाठी सर्जरीची मदत घेतली. तर काहींना मात्र ही नैसर्गिक देणगी मिळाली आहे. उदारणार्थ श्रीदेवी, करिश्मा कपूर यांनी सर्जरीच्या मदतीने आपले सौंदर्य आणखी वाढवले, तर अनिल कपूर-माधुरी दीक्षित यांना निसर्गाची देणगी मिळाली आहे. बॉलिवूडची हवा हवाई गर्ल श्रीदेवी केवळ दक्षिणेतच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीत आघाडीची अभिनेत्री ठरली. तिने आपल्या लूकमध्ये वेळोवेळी बदल करुन घेतले. काही वर्षांपूर्वी नाकावरील शस्त्रक्रियेमुळे श्रीदेवी चर्चेत आली होती. मात्र श्रीदेवीने कधीच ही गोष्ट मान्य केली नाही. पण तिची पुर्वीची आणि आताची छायाचित्रे बघितली असता, तिच्या नाकाच्या आकारातील बदल स्पष्ट दिसतो.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच बॉलिवूड स्टार्सविषयी सांगतोय, जे वाढत्या वयात म्हातारे नव्हे तर चक्क तरुण दिसत आहेत.

श्रीदेवी
श्रीदेवीचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळानाडूतील एक छोटेशे गाव मीनमपट्टी येथे झाला. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी श्रीदेवीने तामिळ सिनेमात बालकलाकार म्हणून एन्ट्री घेतली. 1976 पर्यंत तिने दाक्षिणात्य सिनेमांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले. तर अभिनेत्री म्हणून 1976 साली आलेल्या मुंदरु मुदिची या तामिळ सिनेमात ती झळकली. आपल्या तीन दशकांच्या करिअरमध्ये तिने जवळजवळ 200 सिनेमांमध्ये काम केले. हिंदीत अभिनेत्री म्हणून 1979 साली आलेल्या सोलहवां सावन या सिनेमात ती झळकली. मात्र या सिनेमातून तिला यश मिळाले नाही. त्यानंतर 1983 साली हिम्मतवाला या सिनेमातून ती पुन्हा बॉलिवूडकडे वळली आणि नंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या आणखी अशाच बॉलिवूड स्टार्सविषयी जे दिवसेंदिवस आणखीच तरुण होत चालले आहेत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...