आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धर्मेंद्र, जितेंद्रसह या प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सच्या पत्नी आहेत लाइमलाइटपासून दूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे - धर्मेंद्र (इनसेटमध्ये त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाशकौर), उजवीकडे - जितेंद्र पत्नी शोभा कपूरसोबत.)
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये अनेक असे अभिनेते आहेत, ज्यांनी नाव, पैसा, प्रसिद्धी सर्वकाही मिळवले. मात्र त्यांच्या पत्नींना फार कमी लोक ओळखतात. असेच एक अभिनेते म्हणजे बॉलिवूडचे हिमॅन धर्मेंद्र. त्यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये 'फूल और पत्थर','चुपके-चुपके','शोले','मेरा गांव मेरा देश','धरमवीर, 'जीवनमृत्यु' आणि ' यमला पगला दीवाना'सह अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली.
धर्मेंद्र यांनी आपल्या आयुष्यात दोनदा लग्न केले. त्यांचे पहिले लग्न वयाच्या केवळ 19 व्या वर्षी झाले होते. प्रकाशकौर हे त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव असून 1954 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. लग्नाच्यावेळी धर्मेंद्र सिनेसृष्टीत कार्यरत नव्हते. धर्मेंद्र-प्रकाशकौर यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. सनी आणि बॉबी ही मुलांची तर विजेता आणि अजीता देओल ही मुलींची नावे आहेत. बॉलिवूडमध्ये यशस्वी झाल्यानंतरसुद्धा धर्मेंद्र यांच्या पत्नी प्रकाशकौर नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहिल्या आहेत.
जितेंद्र आणि शोभा कपूर
धर्मेंद्र यांच्याशिवाय आणखी एक अभिनेते असे आहेत, ज्यांची लाइफ पार्टनरसुद्धा लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते. त्या अभिनेत्याचे नाव आहे जितेंद्र. त्यांनी 'फर्ज', 'मेरे हुजर', 'जीने की राह', 'मेरे हमसफर', 'हमजोली', 'हिम्मत', 'परिचय' आणि 'तोहफा' यांसारखे हिट सिनेमे बॉलिवूडला दिले. जितेंद्र यांनी 1974 मध्ये शोभा कपूर यांच्यासोबत लग्न केले. लग्नापूर्वी शोभा ब्रिटिश एअरवेजमध्ये एअरहोस्टेस म्हणून कामाला होत्या. लग्नानंतर शोभा यांनी नोकरी सोडून कुटुंबाला प्राधान्य दिले.
पुढील स्लाईड्समध्ये भेटा, आणखी अशा काही अभिनेत्यांना ज्यांच्या पत्नी असतात लाइमलाइटपासून दूर...