एन्टरटेन्मेंट डेस्कः ड्रीमगर्ल नावाने प्रसिद्ध असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी 16 ऑक्टोबर रोजी वयाची 67 वर्षे पूर्ण करत आहेत. सिनेमांसोबतच त्या आपल्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिल्या. त्यांनी विवाहित असलेल्या धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केले होते. त्यांची ही लव्ह स्टोरी सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीविषयी विशेष कुणाला काही ठाऊक नाहीये.
वयाच्या 19 व्या वर्षी झाले होते धर्मेंद्र यांचे पहिले लग्न
धर्मेंद्र यांचे पहिले लग्न वयाच्या 19 व्या वर्षी प्रकाश कौर यांच्यासोबत झाले होते. ही 1954 ची गोष्ट आहे. लग्नाच्यावेळी धर्मेंद्र यांचा सिनेसृष्टीत प्रवेश झाला नव्हता. धर्मेंद्र -प्रकाश यांना दोन मुली आणि दोन मुले आहेत. सनी आणि बॉबी ही मुले तर विजेता आणि अजीता देओल ही त्यांच्या मुलींची नावे आहेत. धर्मेंद्र बॉलिवूडचे सुपरस्टार ठरल्यानंतरसुद्धा त्यांच्या पत्नी प्रकाश कायम लाइमलाइटपासून दूर राहिल्या.
बॉलिवूडमध्ये धर्मेंद्र यांच्याप्रमाणेच आणखीह काही स्टार्स आहेत, ज्यांच्या पत्नी कधीच प्रसिद्धीझोतात येत नाहीते. या पॅकेजच्या माध्यमातून divyamarathi.com तुम्हाला लाइमलाइटपासून कायम दुर राहणा-या सेलिब्रिटींच्या पत्नींविषयी सांगत आहे...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशा जोड्यांविषयी...