आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे धर्मेंद्रची पहिली पत्नी, लाइमलाइटपासून दुर राहतात या 23 Star Wives

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः ड्रीमगर्ल नावाने प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री हेमामालिनी यांनी १६ ऑक्टोबर रोजी वयाची ६८ वर्षे पूर्ण केली आहेत. सिनेमांसोबतच त्यांचे खासगी आयुष्यसुद्धा चर्चेत राहिले आहे. त्याचे कारण म्हणजे हेमा यांनी विवाहित धर्मेंद्र यांच्यासोबत दुसरे लग्न केले होते. त्यांची लव्ह स्टोरी तशी सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीविषयी फारसे कुणाला माहित नाही.

वयाच्या १९ व्या वर्षी झाले होते धर्मेंद्र यांचे पहिले लग्न...
धर्मेंद्र यांचे पहिले लग्न वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी झाले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर आहे. १९५४ मध्ये दोघे विवाहबद्ध झाले होते. त्याकाळात धर्मेंद्र यांची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली नव्हती. धर्मेंद्र-प्रकाश यांना सनी आणि बॉबी ही दोन मुले आणि विजेता आणि अजिता या दोन मुली आहेत. बॉलिवूडमध्ये धर्मेंद्र नावारुपास आल्यानंतरसुद्धा त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर लाइमलाइटपासून कायम दूर राहिल्या.
धर्मेंद्रच नव्हे तर बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांनी सर्वसामान्य तरुणींची जोडीदाराच्या रुपात निवड केली आहे. या अभिनेत्यांच्या पत्नी लग्नापूर्वीच नाही तर लग्नानंतरसुद्धा सिनेसृष्टीपासून कायम दूर राहिल्या आहेत. आर. माधवन, सोनू सूद आणि सोहेल खानसह असे अनेक अभिनेते आहेत, जे सिनेसृष्टीत अॅक्टिव आहेत, मात्र त्यांच्या पत्नी कधीच लाइमलाइटमध्ये येत नाहीत.
या पॅकेजमधून जाणून घेऊयात लाइमलाइटपासून दुर राहणा-या स्टार्स वाइफविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...