आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमच नव्हे, राणी, श्रीदेवी, आफताबसह या 15 सेलिब्रिटींनीही थाटले होते गुपचुप लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः राणी मुखर्जी, किम शर्मा - Divya Marathi
फाइल फोटोः राणी मुखर्जी, किम शर्मा
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी आपल्या प्रेमाचा सुगावा जगाला लागू न देता अगदी गुपचुप पद्धतीने लग्न थाटले. अशीच एक सेलिब्रिटी आहे किम शर्मा. किमने नुकतीच वयाची 36 वर्षे पूर्ण केली आहेत. 21 जानेवारी रोजी तिचा वाढदिवस होता. किमने केन्याचे बिझनेसमन अली पुंजानीबरोबर 2010 साली लग्न केले. मात्र या दोघांच्या अफेअरच्या बातम्या कधीच कुणाच्याही कानी पडल्या नाही. किमचे लग्न तिच्या चाहत्यांसाठी सरप्राईज होते. लग्नाच्या तीन वर्षांनंतर किमने सांगितले की, लग्न करुन मी आनंदात असून आयुष्याची मजा लुटत आहे. किमचे हे पहिले तर अलीचे हे दुसरे लग्न आहे.
तसं पाहता गुपचुप पद्धतीने लग्न उरकणारे किम आणि अली हे बॉलिवूडमधील पहिले दाम्पत्य नाहीये. यापूर्वी अनेक सेलिब्रिटी असे आहेत, ज्यांनी त्यांच्या चाहत्यांना तर सोडा, मात्र मीडिया आणि आपल्या जवळच्या लोकांनासुद्धा आपल्या प्रेमाचा सुगावा लागू दिला नाही. काही सेलिब्रिटींनी थेट लग्न करुन आपले प्रेमप्रकरण जाहिर केले. तर काही सेलिब्रिटींच्या लग्न त्यांच्या प्रेग्नंसीनंतर उघड झाले. यामध्ये राणी मुखर्जी, आफताब शिवदासानी, जुही चावला, श्रीदेवीसह अनेक सेलिब्रिटींच्या नावाचा उल्लेख करता येईल.
राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा
चित्रपट निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्रा आणि अभिनेत्री राणी मुखर्जीने 21 एप्रिल 2014 रोजी गुपचुप लग्न थाटले. इटलीत एका खासगी समारंभात दोघे बोहल्यावर चढले. यशराज फिल्म्सच्या वतीने या दोघांची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली होती. राणी आणि आदित्यच्या अफेअरची ब-याच काळापासून चर्चा रंगत होती. मात्र या दोघांनी कधीही सार्वजनिकरित्या आपल्या नात्याची कबूली दिली नव्हती. या दोघांच्या लग्नाचे एकही छायाचित्र मीडियात प्रकाशित झाले नव्हते.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशा काही सेलिब्रिटींच्या अफेअर्सबद्दल सांगतोय ज्यांनी कित्येक वर्षे आपले प्रेम जगापासून लपवले.... पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या या सेलिब्रिटींविषयी...